‘अशा वडिलांना भरचौकात फाशी द्यावी…’, जिया खान तिच्या वडिलांचा का करत होती इतका तिरस्कार ?


लहान वयात जगाचा निरोप घेतलेल्या जिया खानचा आज वाढदिवस आहे. जियाने 2013 मध्ये तिच्या जुहू फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिने असे पाऊल उचलण्यामागे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिया खानचे बालपणही संघर्षमय होते. तिचे वडील तिला लहानपणी सोडून गेले होते. यानंतर कुटुंबाने जगण्यासाठी खूप संघर्ष केला. यामुळे जिया आयुष्यभर वडिलांचा द्वेष करत राहिली.

तिला चित्रपटसृष्टीतून खूप प्रेम मिळाले. आमिर खान, अमिताभ बच्चन यांसारख्या बड्या सुपरस्टार्ससोबत तिने काम केले. पण ती आयुष्यभर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप त्रस्त राहिली. जिया खानच्या वडिलांचे नाव अली रिझवी आणि आईचे नाव राबिया अमीन होते. तिला तिच्या वडिलांचा इतका तिरस्कार होता की तिने एका मुलाखतीत तिच्या सारख्या वडिलांना फाशी द्यावी, असेही म्हटले होते.

खरे तर जिया खान अवघ्या 2 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिच्या बहिणी आणि आईला सोडले. यानंतर हे कुटुंब एकटे पडले. एका मुलाखतीत आपल्या वडिलांबद्दल बोलताना ती म्हणाली होती – ज्या माणसाने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला आणि पत्नीला मागे सोडले, अशा वडिलांना भरचौकात फाशी द्यायला पाहिजे. वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई राबिया अमीन यांनी मुलांना एकट्याने वाढवले. जिया खानला वयाच्या 6 व्या वर्षापासून अभिनयाची आवड होती, असे म्हटले जाते.

राम गोपाल वर्मा यांच्या निशब्द या चित्रपटातून जियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ तीन चित्रपट केले, परंतु तिन्ही चित्रपटांमध्ये तिने केवळ मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम केले. जियाने तिचा पहिला चित्रपट ‘निशब्द’मध्ये अमिताभ बच्चनसोबत रोमान्स केला होता. तिचा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. यानंतर, 2008 मध्ये ती आमिर खानसोबत सुपरहिट चित्रपट गजनीमध्ये दिसली होती. याशिवाय तिने 2010 मध्ये अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसोबत हाऊसफुल हा चित्रपटही केला होता.