जगात होतात अशीही लग्ने


सर्वसाधारणपणे समाजात वधू व वर यांच्यात विवाह होतात. आजकाल पुरूष-पुरूष व महिला-महिला यांच्यातही लग्ने होतात आणि अनेक देशांनी असल्या लग्नांना मान्यताही दिली आहे. मात्र जगात अशीही कांही लग्ने झाली आहेत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अशाच कांही लग्नांची ही माहिती


अर्जेंटिनातील रोमिना प्रिन या मुलीने तिच्या वाग्दत्त वराला धडा शिकविण्यासाठी चक्क पाळीव कुत्र्याशी लग्न केले आहे. रोमिनाच्या लग्नाची तारीख वेळ निश्चित झाली असताना अचानक या वराने तिच्याशी लग्नाला नकार दिला. रोमिनाने आपले लग्न ठरल्यावेळीच झाले पाहिजे असा आग्रह धरला व तीच तारीख व वेळ पकडून आपल्या पाळीव कुत्र्याशी लग्न लावले. विशेष म्हणजे यात तिच्या कुटुंबियांचाही तिला पाठिंबा मिळाला.


रशियातील एका युवकाचे पिझ्झाशी लग्न केले आहे.दीर्घ काळ एकटाच राहून तो कंटाळला होता. तो नेहमी रशियातील साऊथ सेंट्रल पिझ्झा स्टोरमध्ये जात असे. अखेर त्याने येथेच पूर्ण पारंपारिक पद्धतीने विवाह करून पिझाला आपली वधू म्हणून स्वीकारले.

कॅलिफोर्नियातील सॅन डियागो मधील ४५ वर्षीय कॅरोल सांता फे ने २०१५ मध्ये लास वेगास सांता फे स्टेशनबरोवर विवाह केला आहे. ती सांगते गेली ३६ वर्षे मी या स्टेशनच्या प्रेमात आहे. गतवर्षी तिने स्टेशनबरेाबर लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. तिने स्वतःचे नांव ही कॅरोल सांता फे असे केले आहे.


पॅरिस या रोमँटिक शहराची रहिवासी असलेल्या व माजी सैनिक म्हणून निवृत्त झालेल्या एरिकाने आयफेल टॉवरशी लग्न केले आहे. तिनेही स्वतचे नांव बदलून एरिका ला टावर एफिल असे केले आहे. ती म्हणते या शहराचे माझ्या हृदयात खास स्थान आहे.


थायलंडमधील चाडिल डिफी याने गर्लफ्रेंडच्या शवाबरोबर लग्न केले. डिफीने गर्लफ्रेड सरण्या कडे कामामुळे पुरेसे लक्ष दिले नव्हते. इतकेच नव्हे कामावर लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून त्याने सरण्याशी लग्नास नकार दिला होता. सरण्याचा एका कार अपघातात मृत्यू झाला तेव्हा मात्र याला आपणच कारण आहोत या भावनेने त्याने सरण्याच्या शवाबरोबर लग्न केले व त्यानंतर शवावर अंत्यसंस्कार केले गेले.


भारतातही अशा लग्नांची नोंद आहे. बिमबाला दास नावाच्या मुलीने २०१६ साली कोब्रा जातीच्या नागाशी लग्न केले आहे. हा नाग अतिविषारी समजला जातो. ३० वर्षीय बिमबालाने सिल्कची साडी या लग्नात नेसली होती. तिला जेव्हा केव्हा जोडीदाराची भेट घ्यावी वाटते तेव्हा ती दुधाची वाटी त्याच्या बिळापाशी आणून ठेवते व कोब्रा त्यावेळी बाहेर येतो असे सांगते.

Leave a Comment