लिपस्टीक कशी निवडाल व कशी वापराल


आजकाल बहुतेक सार्‍या महिला लिपस्टीकचा वापर करतात. लिपस्टीक ही नुसते ओठांचे व चेहर्‍याचे सौंदर्य वाढविते असे नाही तर ती आपला आत्मविश्वासही वाढवित असते. त्यामुळे ती कशी वापरावी याची माहिती असणे गरजेचे आहे.

आजकाल मार्केटमध्ये लिपस्टीकच्या हजारो शेडस मिळतात. मात्र त्यातल्या कोणत्या शेड आपल्या त्वचेला सूट करतात हे ओळखता यायला हवे. त्यासाठी आपल स्कीन टोन जाणून घ्यावा लागतो. तो जाणण्याचा मार्ग अगदी सोपा आहे. आपल्या मनगटाजवळ रक्तवाहिन्या किंवा नसा दिसतात. या नसांचा रंग निळा असेल तर आपला स्कीन टोन कूल आहे, हाच रंग हिरवा असेल तर आपला स्कीन टोन वॉर्म आहे व या ठिकाणी निळ्या व हिरव्या दोन्ही रंगांच्या नसा असतील तर आपला टोन न्यूट्रल आहे हे ओळखावे.


कूल टोनला रेड, ऑरेंज व पेस्टल कलर्सच्या लिपस्टीक विशेष शोभतात. वॉर्म टोनला रेड, पिवळसर शेड असलेला ऑरेंज व पिंक कलरशेड चांगल्या दिसतात. न्यूट्रल टोनवाले जास्त भाग्यशाली असतात कारण त्यांना कुठल्याही शेडस चांगल्याच दिसतात. त्यातही पर्पल व वाईन कलरच्या शेडस त्यांच्यावर अधिक खुलतात.

लिपस्टीक नुसती लावून चालत नाही तर ती ओठावर दीर्घकाळ टिकायलाही हवी. त्यासाठी लिपस्टीक अगोदर ओठांना लिपबाम लावून घ्यावे. टूथब्रशच्या मदतीने ओठांवरची डेड स्कीन हळूवार स्वच्छ करावी. आता आपले ओठ अधिक स्मूथ झालेत हे लक्षात येते. त्यानंतर पुन्हा एकदा कंसीलर किंवा पावडरचा अगदी पातळ थर लावावा, तो ब्रशच्या सहाय्याने एकसारखा पसरवावा व नंतर ओठांच्या कडांनी लिपलायनर लावून त्यात लिपस्टीक फिल करावी. यामुळे ओठ जास्त उठावदार व आकर्षक दिसतात.

Leave a Comment