फूल विक्रेत्याच्या मुलाने केली गोलंदाजांची अशी धुलाई, 10 षटकार आणि 39 चौकारांसह केल्या 346 धावा, संघाने एकदिवसीय ट्रॉफी जिंकली


ज्यांना लढण्याची कला अवगत असते, तेच मैदानात खंबीरपणे उभे राहतात आणि जर ही कौशल्ये लहानपणापासून शिकली गेली, तर मैदानावर त्याचा प्रभाव कसा असतो, ते श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेत दिसला. जिथे एका फलंदाजाने 10 षटकार आणि 39 चौकारांसह 346 धावा करत आपल्या संघाला वनडे ट्रॉफी जिंकून दिली. आम्ही बोलत आहोत पथुम निसांकाबद्दल, ज्याने अफगाणिस्तानविरुद्ध अशी स्फोटक फलंदाजी दाखवली की श्रीलंकेला वनडे ट्रॉफी जिंकण्यात काहीच अडचण आली नाही.

अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रीलंकेने क्लीन स्वीप केला. म्हणजे 3 वनडे मालिका 3-0 ने जिंकली. 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान खेळल्या गेलेल्या या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात प्रमुख खेळाडू होता, तो पथुम निसांका. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात द्विशतक आणि नंतर तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून हा 25 वर्षीय फलंदाज हिरो ठरला आणि, अशा प्रकारे त्याने आपल्या 346 धावांची स्क्रिप्ट लिहिली.

खरं तर, आपण ज्या 346 धावा बद्दल बोलत आहोत, त्यात 10 षटकार आणि 39 चौकार हे पथुम निसांकाने एका सामन्यात केलेल्या धावा नसून संपूर्ण एकदिवसीय मालिकेतील धावा आहेत. 14 फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, पथुम निसांकाने 101 चेंडूंचा सामना केला आणि 16 चौकार आणि 2 षटकारांसह 118 धावा केल्या. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे 5 वे शतक होते. मालिकेतील दुसऱ्या वनडेत पथुमला केवळ 18 धावा करता आल्या. पण, पहिल्या सामन्यात त्याने नाबाद राहताना 210 धावांची अप्रतिम खेळी केली. पथुमच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वात मोठी धावसंख्या होती.

अशाप्रकारे, 2 शतकांसह 173 च्या सरासरीने 346 धावा करून, पथुम निसांका केवळ एकदिवसीय मालिकेतील सर्वात यशस्वी फलंदाजच नाही, तर आपल्या संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो देखील ठरला. हे शक्य झाले, कारण पथुम निसांकाने मैदानावर ठाम राहून अफगाण गोलंदाजांचा सामना केला. सलामीवीर म्हणून त्यांचे सुरुवातीचे हल्ले झेलले. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला त्याने स्वतःच्या हल्ल्याने प्रत्युत्तर दिले.

युवा उजव्या हाताचा फलंदाज पथुम निसांका हे श्रीलंकन ​​क्रिकेटचे भविष्य आहे. त्याचे बालपण खूप संघर्षमय आणि गरिबीत गेले. आई फुलविक्रेते म्हणून काम करत होती आणि वडील एक सामान्य ग्राऊंडसमन होते. कुटुंबाचे उत्पन्न खूपच कमी होते. अशा परिस्थितीत जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टींचा अभाव होता. पथुम निसांकाने आपल्या आई-वडिलांसोबत त्या त्रासाचा सामना केला आणि त्यातून खूप काही शिकले. त्या कालखंडाने पथुमला मानसिकदृष्ट्या मजबूत फलंदाज बनण्यास मदत केली, जी त्याच्या फलंदाजीतही दिसून येते.