AI Voice Cloning Scam : आईने फोन करून मागितले आहेत पैसे? पाठवण्यापूर्वी थोडे हे समजून घ्या


जर एखाद्या दिवशी अचानक तुमची आई तुम्हाला फोन करून काही वाईट बातमी सांगते आणि पैसे मागू लागली, तर घाबरू नका. शांत राहा आणि सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा आणि अॅक्शन घ्या. कदाचित एखादा घोटाळा करणारा तुमच्या आईच्या आवाजात बोलत असावा. खरं तर, आजकाल, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानामुळे, घोटाळे करणारे अधिक हुशार झाले आहेत. लोकांना लुटण्याच्या नवनवीन पद्धती ते अवलंबत आहेत. यापैकी एक पद्धत व्हॉइस क्लोनिंग आहे.

एआय व्हॉईस क्लोनिंग हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची अचूक कॉपी करता येते. फसवणूक, ओळख चोरी आणि इतर गुन्ह्यांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

एआय व्हॉईस क्लोनिंग का आहे धोकादायक ?

  • AI व्हॉईस क्लोनिंगचा वापर लोकांना फसवण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या पालकांची किंवा कोणत्याही नातेवाईकाची तोतयागिरी करून तुमच्याकडे पैसे मागितले जाऊ शकतात किंवा तुमची महत्त्वाची कागदपत्रे मागवली जाऊ शकतात.
  • बँक अधिकाऱ्याच्या आवाजाची नक्कल करून आणि एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्याचे तपशील काढून पैसे उकळण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
  • एआय व्हॉईस क्लोनिंग इतर सायबर गुन्ह्यांसाठी देखील वापरले जाऊ शकते, जसे की ब्लॅकमेल करणे आणि एखाद्याला धमकावणे.

एआय व्हॉईस क्लोनिंग कसे ओळखावे

  • AI व्हॉईस क्लोनिंग शोधणे कठीण आहे, परंतु तुम्हाला सतर्क करण्याचे काही मार्ग आहेत.
  • आवाजात काही विचित्र वाटत असेल, तर एआय व्हॉईस क्लोनिंग नेहमीच पूर्णपणे अचूक नसते. आवाजात काहीतरी विचित्र वाटू शकते, जसे की शब्दांचा उच्चार चुकीचा आहे किंवा आवाजात रोबोटिक शैली आहे.
  • जर तुम्हाला आवाजाचे अनुकरण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून कॉल आला आणि तो किंवा ती तुम्हाला असे काहीतरी करण्यास सांगत असेल, जे त्या व्यक्तीसाठी सामान्य नाही, तर ते AI व्हॉइस क्लोनिंग असू शकते.
  • कॉलर ज्याचा दावा करत आहे, तो तोच नसल्याची तुम्हाला शंका असल्यास, कॉल परत करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.

एआय व्हॉईस क्लोनिंग कसे टाळावे

  • वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करणे टाळा, जसे की तुमच्या आवाजाचे रेकॉर्डिंग.
  • तुमच्या सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
  • तुमचा पूर्ण विश्वास असल्याशिवाय तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नका.
  • तुमच्या फोनवर ट्रू कॉलर ॲप इन्स्टॉल करा. हे तुम्हाला अज्ञात क्रमांक ओळखण्यात मदत करेल.
  • AI व्हॉइस क्लोनिंगबद्दल तुमचे कुटुंब आणि मित्रांना जागरूक करा.
  • जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही AI व्हॉईस क्लोनिंगचे बळी आहात, तर तत्काळ पोलिसांना कळवा.

टीप: AI व्हॉईस क्लोनिंग हे एक नवीन तंत्रज्ञान आहे आणि अजून विकसित होत आहे. भविष्यात, एआय व्हॉइस क्लोनिंग शोधणे अधिक कठीण होऊ शकते. म्हणून, आपण नेहमी सावध रहा आणि कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार केला पाहिजे.