जगभरात भारताच्या UPI चा दबदबा, आता या देशांसोबत वाढणार भारताची डिजिटल कनेक्टिव्हिटी


भारताचा UPI जगभरात धुमाकूळ घालत आहे. अलीकडे, आयफेल टॉवरवर UPI वापरल्यानंतर, आणखी 2 देशांसोबत भारताची डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 12 फेब्रुवारी रोजी श्रीलंका आणि मॉरिशससाठी UPI सेवा सुरू करणार आहेत. यासोबतच या दोन देशांमध्ये UPI आणि RuPay कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असेल. UPI ग्लोबल बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

PM मोदी दुपारी 1 वाजता या देशांसाठी UPI लाँच करतील. त्यामुळे या दोन देशांतील भारतीय पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवरनंतर हळूहळू संपूर्ण देशात UPI सेवा लागू केली जाईल.


परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लॉन्चनंतर श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI सेवा सुरू होईल. UPI सुरू झाल्यामुळे या दोन देशांना भेट देणारे भारतीय पर्यटक आणि भारताला भेट देणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. मॉरिशससाठी RuPay कनेक्टिव्हिटी देखील सुरू केली जाईल. आरबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले त्याचे थेट प्रक्षेपण आरबीआयच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, मॉरिशसमध्ये रुपे कार्ड सेवा सुरू केल्यानंतर, रुपे कार्ड भारतात तसेच मॉरिशसमध्ये वापरले जाऊ शकते. भारत फिनटेक क्रांतीचा नेता म्हणून उदयास आला आहे. देशातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत. या लॉन्चमुळे दोन्ही बाजूंच्या लोकांना सीमेपलीकडे डिजिटल व्यवहारांची सुविधा मिळू शकणार आहे. याशिवाय या देशांशी भारताची डिजिटल कनेक्टिव्हिटीही वाढेल.