900 कोटींची कमाई करूनही शांत होणार नाही ‘अॅनिमल’, या पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिस हादरवणार रणबीर


रणबीर कपूरने डिसेंबर 2023 मध्ये ‘अॅनिमल’ बनून इतिहास रचला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आणि जगभरात सुमारे 915 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. इतक्या मजबूत कमाईसह, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला आणि रणबीरच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. मात्र, हे प्रकरण इथेच थांबणार नाही. ॲनिमलनंतर रणबीरकडे अनेक चित्रपट आहेत, ज्यात बॉक्स ऑफिसला हादरवून सोडण्याची ताकद आहे. येत्या काळात रणबीर ज्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे, त्या चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

ॲनिमल पार्क: ॲनिमल सोबतच, निर्मात्यांनीही त्याचा सीक्वल येणार असल्याचे जाहीर केले होते, जो ‘ॲनिमल पार्क’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. ‘ॲनिमल’चा शेवटचा सीन पाहून दुसऱ्या भागात आणखी रक्तपात होणार असल्याचे समजले. ‘ॲनिमल’ची दमदार कमाई पाहून ‘ॲनिमल पार्क’ बॉक्स ऑफिसलाही हादरवू शकेल, असा अंदाज बांधता येतो.

ब्रह्मास्त्र 2: ‘ब्रह्मास्त्र 2’ हा देखील रणबीरच्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे. त्याचा पहिला भाग 2022 मध्ये आला होता. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यासोबतच दुसरा भागही जाहीर झाला. ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत.

रामायण- या यादीत एक नाव आहे ते नितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रामायण’चे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटात रणबीर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे. याशिवाय या चित्रपटात सनी देओलही दिसणार आहे, जो हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

लव्ह अँड वॉर: संजय लीला भन्साळी यांचा पुढील चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ आहे. यामध्ये रणबीरसोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील दिसणार आहे. तसेच या चित्रपटात विकी कौशलही मुख्य भूमिकेत आहे. म्हणजेच हे तीन मोठे स्टार्स एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याची शक्यता आहे.

राजकुमार हिराणीसोबतचा चित्रपट- गेल्या काही दिवसांपासून आणखी एका चित्रपटाची चर्चा होत आहे. राजकुमार हिरानी हा चित्रपट बनवणार असून त्यात रणबीर मुख्य भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण जर हे दोघे खरंच एकत्र आले, तर नक्कीच काहीतरी मोठे होईल, कारण त्यांचा आधीचा ‘संजू’ हा चित्रपट खूप गाजला होता.