बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग डॉन फ्रँचायझीच्या ‘डॉन 3’मुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर दिसणार असल्याचे समोर आल्यापासून त्याचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. दरम्यान, आता रणवीरच्या आणखी एका चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आले आहे.
रणवीर सिंगच्या ‘शक्तिमान’बाबत मोठे अपडेट! किती असेल बजेट? कधी सुरू होणार शूटिंग? हे जाणून घ्या
काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की रणवीर मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तीमान’ या प्रतिष्ठित व्यक्तिरेखेवरील चित्रपटासाठी चर्चेत आहे. मात्र, नंतर या गोष्टी ठप्प झाल्या आणि याबाबत काहीही समोर आले नाही. पण आता बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार, सोनी पिक्चर्स आणि साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची संयुक्त निर्मिती करणार आहेत.
असे सांगितले जात आहे की निर्माते या चित्रपटाचे काम पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहेत आणि असे म्हटले जात आहे की एकदा रणवीर डॉन 3 चे शूटिंग पूर्ण करेल, त्यानंतर शक्तिमानचे शूटिंग सुरू होईल. हा बिग बजेट चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. तो बनवण्यासाठी निर्माते सुमारे 300 ते 350 कोटी रुपये खर्च करणार आहेत. मात्र, याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सोनी पिक्चर्सने गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती आणि मुकेश खन्ना यांना त्याचे क्रिएटिव्ह सल्लागार बनवले होते. तथापि, या चित्रपटातील कलाकारांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा रणवीर सिंगच्या नावाची पुष्टी झाली नाही. पण या चित्रपटात रणवीर शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये बोलले जात होते. मात्र, आता या चित्रपटाबाबत आणखी काय निष्पन्न होते, हे पाहायचे आहे. मात्र या चित्रपटात रणवीर खरोखरच दिसणार असेल, तर हा त्याच्या करिअरमधील मोठा चित्रपट ठरू शकतो.