‘पुष्पा 2’ अद्याप आला देखील नाही, समोर आले ‘पुष्पा 3’चे अपडेट, पण याहूनही आहे मोठी बातमी


2024 मध्ये ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे, तो दुसरा कोणी नसून साऊथ स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 आहे. पुष्पा 2 बद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. सध्या ‘पुष्पा 2: द रुल’चे काम जोरात सुरू आहे. निर्मात्यांना आता कोणताही विलंब न करता हा चित्रपट प्रदर्शित करायचा आहे.

अलीकडेच, पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनचा साडीमधील लुकचा एक लीक झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, पुष्पा फ्रँचायझीचा तिसरा भागही बनवला जाणार आहे. जो सध्या फ्लोअरवर गेलेला नाही. पुष्पा 3 बनत असल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. या चित्रपटाच्या नावाबाबतही चाहत्यांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की पुष्पा 3 हा चित्रपटाचा शेवटचा भाग असणार नाही आणि चित्रपटाचे खरे शीर्षक देखील अद्याप समोर आलेले नाही. पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो लॉकडाऊननंतर रिलीज झाला होता. पण हा चित्रपट प्रदर्शित होताच धमाका झाला. पुष्पा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा सुरू झाली.

अल्लू अर्जुन आणि संगीतकार देवी श्री प्रसाद यांनाही या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचा सीक्वल, पहिला भाग जिथे संपला तिथून सुरू होणार आहे. रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगदीश प्रताप बंदरी, प्रकाश राज, जगपती बाबू आणि अनेक स्टार्स या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.