शाहिद कपूरच्या मागे का लागले आहे सेन्सॉर बोर्ड? आता या चित्रपटाच्या दृश्यांवरही चालवली कात्री


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे चित्रपट गेल्या काही काळापासून चांगली कमाई करत आहेत. त्याच्या आधीच्या कबीर सिंग या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. मात्र त्याच्या या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. याशिवाय, तुम्ही शाहिद कपूरचे चित्रपटांचा इतिहास पाहिला, तर जेव्हाही शाहिद कपूरचा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार असतो, तेव्हा त्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री आधीच चालवली असते. आता जेव्हा त्याचा तेरी बातों में ऐसा उल्झा जिया हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्या निमित्ताने त्याच्या चित्रपटालाही सेन्सॉर बोर्डाच्या हस्तक्षेपाला सामोरे जावे लागत आहे.

आता सेन्सॉर बोर्डाने शाहिद कपूरच्या आणखी एका चित्रपटावर कात्री चालवली आहे. आगामी ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटातील एका लव्ह मेकिंग सीनबाबत असे करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, हा सीन 9-10 सेकंदाचा आहे आणि हा सीन सेन्सॉर बोर्डाने हटवला आहे. हा सीन नेमका कोणता आहे, याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाच्या लांबीबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट 143 मिनिटे 15 सेकंद म्हणजेच 2 तास 23 मिनिटे 15 सेकंदांचा आहे.

याआधीही सेन्सॉर बोर्डाने शाहिद कपूरच्या चित्रपटावर कात्री चालवली आहे. हे त्याच्या पद्मावत चित्रपटाबाबत दिसले, ज्यामध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग देखील होते. याशिवाय सेन्सॉर बोर्डाने त्याच्या उडता पंजाब या चित्रपटावरही कात्री लावली होती आणि या चित्रपटात 40 हून अधिक कट होते. याशिवाय शाहिद कपूरच्या ‘हैदर’ या चित्रपटातही असेच काहीसे घडले आहे. या चित्रपटातील 40 सीन्सही सीबीएफसीने कापले होते. याशिवाय त्याच्या कबीर सिंग या चित्रपटाबाबत हे दिसले नसले, तरी चित्रपटातील दृश्यांबाबत बराच गदारोळ झाला होता.

शाहीद कपूरचा रोमँटिक चित्रपट तेरी बातों में ऐसा उल्झा जिया 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात शाहिद कपूरसोबत क्रिती सेनन दिसणार आहे. या दोघांचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना शाह यांनी संयुक्तपणे केले आहे.