Tips and Tricks : घरी आहेत का लहान मुले? तर फेसबुकचे हे फीचर हटवेल घाणेरडे फोटो आणि व्हिडिओ


तुमच्या घरीही लहान मुले असतील, तर तुम्ही लगेच फेसबुकमध्ये ही सेटिंग बदलावी. अनेकदा असे दिसून आले आहे की फेसबुकवर स्क्रोल करताना काही घाणेरडे फोटो आणि व्हिडिओ दिसतात, ज्याचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. असे फोटो आणि व्हिडिओ कमी करण्यासाठी फेसबुक ॲपमध्ये एक गुप्त फीचर आहे, जे तुम्हाला फक्त चालू करावे लागेल.

या गुप्त फीचरच्या मदतीने तुम्ही अश्लील मजकूर पूर्णपणे थांबवू शकणार नाही, परंतु बऱ्याच अंशी हे फीचर तुमच्या टाइमलाइनवर असा अश्लील मजकूर येऊ देणार नाही. फेसबुकमध्ये हे फीचर कुठे लपलेले आहे आणि तुम्ही हे फीचर कसे चालू करू शकता? ते आम्ही तुम्हाला सांगतो.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या फोनवर फेसबुक ॲप उघडावे लागेल, ॲप उघडल्यानंतर, तुम्हाला तुमचा प्रोफाइल पिक्चर वरच्या उजव्या बाजूला दिसेल. प्रोफाईल फोटोवर टॅप करताच तुम्हाला काही पर्याय दिसतील, थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला सेटिंग्ज आणि प्रायव्हसीचा पर्याय मिळेल. या पर्यायावर टॅप केल्यानंतर, प्राधान्य विभागात न्यूज फीड पर्यायावर क्लिक करा.

तुम्ही न्यूज फीड पर्यायावर क्लिक करताच, तुम्हाला री-कनेक्ट पर्यायाच्या खाली असलेल्या कमी करा पर्यायावर टॅप करावे लागेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लो-क्वालिटी कंटेंट, अन-ओरिजिनल कंटेंट आणि सेन्सिटिव्ह कंटेंट असे तीन पर्याय मिळतील. तुम्हाला सेन्सिटिव्ह कंटेंट ऑप्शनवर टॅप करावे लागेल, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील, पहिला ऑप्शन बाय डिफॉल्ट ऑन असेल. दुसरा पर्याय Reduce More आहे, तुम्हाला फक्त या पर्यायावर क्लिक करावे लागेल. हे सेटिंग ऑन केल्यानंतर फेसबुक तुमच्या टाइमलाइनवर अश्लील मजकूर येण्यापासून थांबवण्यात मदत करेल.