तुरुंगात जाणार का पूनम पांडे, अफवा पसरवणाऱ्याला काय होते शिक्षा?


मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता, मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शनिवारी स्वत: पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ती जिवंत असल्याचे सांगितले. पूनम पांडेने स्वतः इंस्टाग्रामवर तिच्या मृत्यूची खोटी बातमी शेअर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर लोक संतप्त झाले आहेत. अशा परिस्थितीत, फेक न्यूज पसरवल्याबद्दल पूनम पांडेवर कायदेशीर कारवाई करता येईल का, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

वास्तविक, फेक न्यूज पसरवल्याबद्दल अभिनेत्रीला तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच दंडही आकारला जाऊ शकतो. आयटी कायदा-2000 च्या कलम 67 अंतर्गत, सोशल मीडियावर पहिल्यांदा अफवा पसरवल्याबद्दल कोणी दोषी आढळल्यास, त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. तसेच 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास दोषीला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना पूनम पांडे म्हणाली, ‘हॅलो मी पूनम आहे. मला माफ करा, मी दुखावलेल्यांची माफी मागते. माझा हेतू सर्वांना आश्चर्यचकित करण्याचा होता, कारण मला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर चर्चा करायची होती, ज्याबद्दल आपण जास्त बोलत नाही. होय, मी माझ्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. अचानक आपण सर्वजण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल बोलू लागलो. हा असा आजार आहे, जो शांतपणे तुमचे आयुष्य हिरावून घेतो. या आजाराबद्दल अधिक बोलण्याची गरज आहे. मला अभिमान आहे की माझ्या मृत्यूच्या बातमीमुळे सर्वांना या आजाराची माहिती होऊ लागली आहे.

कंगना राणावत, मुनावर फारुकी, डेझी शाह आणि पूजा भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या निधनाच्या बातमीवर शोक व्यक्त केला होता. कंगना राणावतने इंस्टाग्रामवर शोक व्यक्त केला होता. पूनम पांडे तिच्या रिॲलिटी शोचा एक भाग होती. तिने दु:ख व्यक्त करून सांगितले की, हे अत्यंत दुःखद आहे. कर्करोगाने तरुण स्त्रीला गमावणे ही आपत्ती आहे. पूनम पांडेने कधीही तिच्या गर्भाशयाच्या कर्करोगाचा उल्लेख केला नाही, असे अभिनेत्री संभावना सेठने म्हटले होते. खतरों के खिलाडी या रिॲलिटी शोमध्ये संभावना पूनमसोबत सहभागी झाली होती.