व्हॅलेंटाईन डेला या वास्तु टिप्स वापरून वाढवा प्रेम


व्हॅलेंटाईन डे हा संपूर्ण वर्षातील तो दिवस आहे, ज्या दिवशी लोक प्रेमाला विशेष महत्त्व देतात. या दिवशी, बहुतेक लोक त्यांचे प्रेम व्यक्त करतात आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ देखील घेतात. पण प्रेमासाठी काही निश्चित दिवस नसतो. माणसाच्या आयुष्यात प्रेम सदैव अबाधित राहिले पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रेम कायम राहण्यासाठी आम्ही काही वास्तु टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब तुम्ही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमचे नाते मजबूत करण्यासाठी करू शकता.

प्रत्येक प्रकारची परिस्थिती आरशात प्रतिबिंबित होते. त्यामुळे वास्तूनुसार असे मानले जाते की खोलीत कधीही मोठा आरसा लावू नये. विशेषत: आरसा बेडच्या अगदी समोर ठेवू नये. असे केल्याने वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि नातेसंबंध बिघडू लागतात.

शयनकक्ष आकर्षक आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करण्यासाठी सुगंधित मेणबत्त्या आणि फुलांनी सजवावे. यामुळे तुमच्या नात्यात संतुलन राहते. सुसंवादी आणि शांत वातावरण निर्माण करण्यासाठी मास्टर बेडरूमच्या भिंती गुलाबी रंगात रंगवा किंवा त्याच रंगाचे पडदे वापरा.

जरी लोकांना त्यांच्या आवडीच्या दिशेने झोपल्याने चांगली झोप मिळते, परंतु वास्तूनुसार पाहिले, तर त्यांच्या नात्यात शांती आणि मजबूती टिकवून ठेवण्यासाठी पतीने नेहमी पत्नीच्या उजव्या बाजूला झोपले पाहिजे. वास्तूनुसार मेटल बेड वापरू नका आणि फक्त सिंगल मॅट्रेस वापरण्याचा प्रयत्न करा.

वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण करण्यासाठी बेडरुममध्ये बेड योग्य दिशेने ठेवा. पती-पत्नीने आपल्या बेडरूममध्ये पलंग नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावा. बेडरुममधील बेड नेहमी मुख्य दरवाजापासून दूर असावा. झोपताना डोके दक्षिण, दक्षिण-पूर्व किंवा नैऋत्य दिशेला असावे. झोपताना उत्तरेकडे डोके ठेवू नका.