Mobile Tips : प्रमाणापेक्षेा जास्त हँग होतोय फोन? तर असू शकतात ही 5 कारणे


स्मार्टफोन वापरताना फोन हँग झाल्यामुळे तुम्हालाही त्रास होत असेल, तर राग येणे स्वाभाविक गोष्ट आहे. आपण सर्वजण स्मार्टफोनवर अवलंबून आहोत, मग ते बिल भरणे असो किंवा तिकीट बुक करणे, प्रत्येक लहानमोठे काम मोबाइलद्वारे केले जाते, परंतु जरा कल्पना करा की काम करताना फोनमुळे त्रास होऊ लागला, तर तुम्हाला नक्कीच राग येईल. स्मार्टफोन हँग होण्याची समस्या का उद्भवते आणि ही समस्या कशी सोडवता येईल? ते आम्ही तुम्हाला कळू सांगतो.

सर्वप्रथम मोबाईल का हँग होतो, हे जाणून घेऊया, फोन हँग होण्यामागे एकच नाही तर अनेक कारणे असू शकतात. मेमरी फुल, जुने सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरच्या समस्येमुळे फोन हँग होण्याची समस्या उद्भवते.

मोबाईल हँग होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे फोनची मेमरी फुल होणे. फोनमध्ये स्टोरेज कमी असल्याने ॲप्स चालवण्यात आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये अडचण येत आहे.

काही मोबाईल ॲप्स खराब कोडेड असतात किंवा काही ॲप्समधील बग्समुळे फोन हँग होतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नुकतेच नवीन ॲप इन्स्टॉल केले असेल, त्यानंतर फोन हँग होऊ लागला असेल, तर ते ॲप फोनमधून काढून टाका.

बऱ्याच वेळा असे देखील होते की सॉफ्टवेअर अपडेटमध्ये एक बग दिसून येतो, ज्यामुळे फोन हँग होऊ लागतो. जर तुम्ही अलीकडे फोन अपडेट केला असेल तर हे देखील एक कारण असू शकते.

अनेक वेळा समस्या सॉफ्टवेअरमध्ये नसून हार्डवेअरमध्ये असते, हार्डवेअर हा फोनमध्ये वापरला जाणारा कोणताही भौतिक भाग असतो. फोनच्या कोणत्याही भागात समस्या आली, तरी फोन हँग होऊ शकतो.

जेव्हाही आपण कोणतेही ॲप उघडतो, तेव्हा फोन कॅशे फाइल्स तयार करण्यास सुरवात करतो, कालांतराने कॅशे फाइल्स वाढतात आणि एक वेळ अशी येते की फोनमध्ये कमी जागा असल्यास फोन हँग होऊ लागतो.

कॅशे फाइल्स क्लिअर करा: मोबाइल सेटिंग्जवर जा, ॲप्लिकेशन्सवर जा, त्यानंतर तुम्हाला ज्या ॲपसाठी कॅशे फाइल्स क्लिअर करायच्या आहेत त्या ॲपच्या नावावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला स्टोरेजवर टॅप करावे लागेल, येथे तुम्हाला कॅशे फाइल्स डिलीट करण्याचा पर्याय मिळेल.

ॲप्स अपडेट करा: अनेक वेळा फोनमध्ये बग आल्यावर डेव्हलपर्स ॲपसाठी नवीन अपडेट आणतात, अशा परिस्थितीत प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन ॲपचे अपडेट असल्यास ॲप अपडेट करा.

फॅक्टरी रीसेट: वर नमूद केलेली कोणतीही पद्धत काम करत नसल्यास, तुम्ही फोन फॅक्टरी रीसेट करू शकता.