दारूच्या बाटल्यांसह पकडले गेले भारतीय खेळाडू, पण ट्रोल होऊ लागला विराट कोहली!


खेळांमध्ये खेळाडू अनेकदा वादात सापडतात आणि असेच काहीसे भारतातील काही युवा खेळाडूंसोबत घडताना दिसत आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघाच्या 23 वर्षांखालील खेळाडूंवर काही गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यानंतर त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौराष्ट्रातील काही खेळाडूंकडे दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. आता सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळलेल्या खेळाडूंवर बोर्ड कठोर कारवाई करू शकते.

तरुण खेळाडूंना दारूच्या बाटल्यांसह पकडले जाणे, ही खरोखरच गंभीर घटना आहे. त्यातही गुजरातमध्ये दारूच्या खरेदी-विक्रीवर बंदी आहे, तरीही खेळाडूंकडून दारूच्या बाटल्या सापडल्या, म्हणूनच प्रकरण अधिक गंभीर होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर चाहते विराट कोहलीला ट्रोल करत आहेत.


डीन एल्गरने विराट कोहली ट्रोल होण्यामागचे कारण सांगितले. अलीकडेच एल्गारने विराट कोहलीने त्याच्यासोबत बसून दारू प्यायल्याचा खुलासा केला होता. या खुलाशानंतर अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले. कारण आपल्या फिटनेसची काळजी घेणारा विराट कोहलीही दारू पितो, यावर लोक विश्वास ठेवू शकत नाहीत. डीन एल्गरचा दावा कितपत खरा आहे, हे कोणालाच माहीत नसले, तरी सौराष्ट्र 23 वर्षांखालील खेळाडूंकडे जेव्हा दारूच्या बाटल्या सापडल्या, तेव्हा लोकांनी विराट कोहलीचे नाव घ्यायला सुरुवात केली.


अलीकडेच टीम इंडियाचा माजी क्रिकेटर प्रवीण कुमारने खुलासा केला होता की, टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू दारू पितो, पण या प्रकरणामुळे तोच बदनाम झाला होता. आयपीएलमध्ये दारूशी संबंधित अनेक वाद समोर आले आहेत आणि आता डीन एल्गरने विराटवर केलेल्या खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे.