Box Office : ‘फायटर’ने पाच दिवसांत ओलांडला 200 कोटींचा टप्पा, पण या चित्रपटाच्या राहिला मागे


ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या फायटरची लोक आतुरतेने वाट पाहत होते. रिलीजच्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दीपिका आणि ऋतिकशिवाय या चित्रपटातील अनिल कपूरच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. तसेच, पुलवामा हल्ल्याची कथा आणि ज्या प्रकारे हवाई हल्ल्याचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे, ते कौतुकास्पद आहे. या चित्रपटाने 4 दिवसात 100 कोटींचा टप्पा सहज पार केला होता. पण, असे असूनही, दीपिका गेल्या वर्षी 25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या पठाण चित्रपटाच्या मागे पडली, आता पाचव्या दिवशी फायटरचे कलेक्शन किती वाढले ते जाणून घेऊया.

Sacnilk च्या ताज्या अहवालानुसार, फायटर देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने 4 दिवसांत 118.50 कोटींची कमाई केली होती. आता पाचव्या दिवशी त्याच्या खात्यात आठ कोटी रुपये जमा झाले आहेत. यासह, फायटरने भारतातील सर्व भाषांमध्ये 126.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. रिलीजच्या दिवशी या चित्रपटाने 22.5 कोटींची कमाई केली होती.

त्याचबरोबर हा चित्रपट जगभरात चांगली कामगिरी करत आहे. वर्ल्डवाईड फायटरने 200 कोटींचा टप्पा ओलांडला असून 203.75 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी, चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 142.25 कोटी रुपये झाले आहे. परदेशात चित्रपटाने पाच दिवसांत 61.5 कोटींची कमाई केली आहे. रविवारी फायटरने भारतात 29 कोटींची कमाई केली होती. या आकडेवारीनुसार सोमवारी फारसा व्यवसाय झाला नाही. पण, पहिल्या वीकेंडचा फायदा चित्रपटाला मिळाल्याने भविष्यातही या चित्रपटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या फायटरला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या एक-दोन दिवसांचे आकडे पाहता, ‘पठाण’ आणि ‘जवान’सारखे ब्लॉकबस्टर ठरू शकतात, असे बोलले जात होते, पण आता सातत्याने होणारी घसरण पाहता काही सांगणे कठीण आहे. मात्र, 5 दिवसांत जगभरात 200 कोटींचा आकडा पार करणे सोपे नाही.