Fighter Online Leaked : फायटरच्या निर्मात्यांना मोठा धक्का, संपूर्ण चित्रपट करण्यात आला इंटरनेटवर अपलोड !


बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या फायटर या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. फायटरमध्ये दीपिका आणि ऋतिकला एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकण्यातही यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.

हवाई हल्ल्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत. पण फायटर रिलीज होताच तो ऑनलाइन लीक झाला. चित्रपटाचे निर्माते फायटरला ऑनलाइन पायरसीपासून वाचवू शकले नाहीत. याचाच अर्थ आता पायरसी साईटवर जाऊनही लोक थिएटरमध्ये न जाता तो पाहू शकतात. मात्र, चित्रपटांची पायरसी हा गुन्हा असून ज्यांना हा चित्रपट एन्जॉय करायचा आहे, ते मोठ्या पडद्यावरच पाहण्यास प्राधान्य देतील.

एका रिपोर्टनुसार, ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा चित्रपट ‘फाइटर’ स्क्रीनवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच तो अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लीक झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काही वेबसाईटवर फायटरचे एचडी व्हर्जन चुकीच्या पद्धतीने अपलोड केले आहे. पायरसीसारख्या गोष्टींचा सर्वाधिक त्रास चित्रपट निर्मात्यांना होतो. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही होतो.

मात्र, चित्रपट पायरसीचा बळी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतात आणि काही काळानंतर ते पायरसी वेबसाइटवर उपलब्ध होतात. त्यांना आळा घालण्यासाठी सतत काम केले जाते, परंतु तरीही काही लोक चुकीच्या पद्धती वापरून त्यांची पायरेसी करतात. आता फायटरचे निर्माते त्यावर काय कारवाई करतात हे पाहायचे आहे.