मेरी कोमने घेतली नाही निवृत्ती, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने म्हटले वृत्त चुकीचे


भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने निवृत्तीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. निवृत्तीच्या वृत्ताचे तिने थेट खंडन केले आहे. 6 वेळा विश्वविजेत्या बॉक्सरने सांगितले की, आपल्याबद्दल विधान चुकीचे मांडण्यात आले आहे. ती म्हणाली की, जेव्हा तिला निवृत्त व्हावे लागेल, तेव्हा ती स्वतः मीडियासमोर येऊन घोषणा करेल. मेरी कोमबद्दल बातमी अशी होती की तिने वयामुळे बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतली.

मेरी कोमच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, सध्या निवृत्ती घेण्याचा तिचा कोणताही विचार नाही. वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरने सांगितले की, तिने काही मीडिया रिपोर्ट्स पाहिल्या आहेत, ज्यात असे म्हटले आहे की मी या खेळाला अलविदा केले आहे, जे योग्य नाही.

खरेतर, आसाममधील दिब्रुगढ येथे 24 जानेवारीला एका कार्यक्रमादरम्यान मेरी कोमच्या निवृत्तीची बातमी तिच्या हवाल्याने मीडियात आली होती. वयोमर्यादेमुळे ती यापुढे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असे भारतीय बॉक्सरने सांगितले होते. हे विधान तिच्या निवृत्तीशी जोडले गेले.


मेरी कोमने सांगितले की, 24 जानेवारीला मी एका शाळेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिब्रुगडला गेले होते. तिथे मुलांना प्रोत्साहन देताना मला अजूनही विजयाची भूक असल्याचे सांगितले. मला अजूनही खेळायचे आहे. पण ऑलिम्पिकमधील वयोमर्यादेमुळे मी तेथे भाग घेऊ शकत नाही. मात्र, मी माझा खेळ सुरू ठेवू शकते आणि त्यासाठी माझे लक्ष पूर्णपणे फिटनेसवर आहे.

इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या नियमांनुसार, ऑलिम्पिकसारख्या मोठ्या मंचावर खेळण्यासाठी बॉक्सरसाठी निर्धारित वयोमर्यादा 40 वर्षे आहे. हे नियम पुरुष आणि महिला अशा दोन्ही श्रेणींसाठी आहेत आणि मेरी कोमचे सध्याचे वय 41 वर्षे आहे. त्यामुळे ती ऑलिम्पिक खेळू शकत नाही.