BA पास तरुणांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, लवकर करा अर्ज


बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय उपयुक्त बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने सुरक्षा अधिकारी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2024 पासून सुरू झाली, असून उमेदवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जाचा फॉर्म BOB च्या bankofbaroda.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे सबमिट करावा लागेल.

BOB ने एकूण 38 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण पदांमध्ये प्रवर्गनिहाय पदेही आरक्षित करण्यात आली आहेत. सर्वसाधारणसाठी 18 पदे, SC साठी 5 पदे, ST साठी 2 पदे, OBC साठी 10 पदे आणि EWS साठी एकूण 3 पदे आहेत.

सुरक्षा अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार आर्मी/नेव्ही/एअर फोर्समध्ये कमीत कमी पाच वर्षांच्या कमिशन्ड सेवेसह अधिकारी असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासोबतच अर्ज करणाऱ्या तरुणांचे वय किमान 28 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे. त्याच वेळी, आरक्षित श्रेणीतील अर्जदारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.

या स्टेप्स फॉलो करुन करा अर्ज

  • BOB bankofbaroda.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावर दिलेल्या करिअर विभागात जा.
  • येथे करंट ओपनिंग वर जा.
  • आता सिक्युरिटी ऑफिसर रिक्रूटमेंट नोटिफिकेशन वर क्लिक करा.
  • सूचना वाचा आणि अर्ज भरण्यास सुरूवात करा.

BOB Notification 2024 pdf

सुरक्षा अधिकारी पदांसाठी निवड ऑनलाइन चाचणी आणि सायकोमेट्रिक चाचणीद्वारे केली जाईल. परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.