मुकेश अंबानींच्या एका दिवसाच्या कमाईतून देशात रोज नवे उभारले जाऊ शकते राम मंदिर


अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारी रोजी संपूर्ण जग या क्षणाचे साक्षीदार होईल आणि श्री रामजन्मभूमी मंदिरात प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाईल. पण तुम्हाला माहिती आहे का की, राम मंदिर बांधण्यासाठी कितीही खर्च आला, तरी मुकेश अंबानींना हवे असेल, तर ते आपल्या मालमत्तेने देशात रोज नवे राम मंदिर बांधू शकतात.

होय, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की ते देशात रोज नवे राम मंदिर बांधू शकतात. अलीकडेच मुकेश अंबानी यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 103 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. भारतीय रुपयात त्यांची संपत्ती 8,55,730 कोटी रुपये आहे. अशाप्रकारे वर्षातील 365 दिवसांनी भागले, तर त्यांची रोजची संपत्ती 2,345 कोटी रुपये येते. आता मुकेश अंबानी रोज राम मंदिर कसे बांधू शकतात ते समजून घेऊ.

वास्तविक, अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा एकूण खर्च 1800 कोटी रुपये आहे. हे आम्ही म्हणत नसून राममंदिराच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चा अंदाज आहे. अशा स्थितीत मुकेश अंबानींनी आपल्या संपत्तीने रोज नवे राम मंदिर बांधले तरी वर्षअखेरीस त्यांच्याकडे सुमारे 2 लाख कोटी रुपयांची संपत्ती शिल्लक राहील.

श्री राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ट्रस्टने सुमारे 7,000 लोकांना निमंत्रण पत्रे पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः मंदिराच्या अभिषेक संबंधी तयारीचा आढावा घेत आहेत. ज्यांना निमंत्रणपत्रे पाठवण्यात आली आहेत, त्यात केवळ धार्मिक गुरु, संतच नाही, तर नेते, अभिनेते आणि मोठे उद्योगपती यांचाही समावेश आहे.