IND vs AFG : एवढ्या आकडेवारीनंतरही अक्षर पटेल याच्यावर अन्याय का?


भारतीय क्रिकेट संघाने सध्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. यासह टीम इंडियाने या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. शिवम दुबेने टीम इंडियाच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने दोन्ही सामन्यांमध्ये दमदार खेळी केली आणि अर्धशतके झळकावली. दोन्ही सामन्यांत तो अपराजित राहिला. दुसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वाल देखील चमकला, पण या दोन सामन्यांमध्ये एका खेळाडूने शांतपणे योगदान दिले आणि संघाच्या विजयात त्याचे योगदान नाकारता येणार नाही. हा खेळाडू आहे अक्षर पटेल. रवींद्र जडेजा नसताना अक्षर पटेलला T20 मध्ये संधी मिळते, पण आकडेवारी बघितली, तर जडेजापेक्षा अक्षर पटेलला प्राधान्य मिळायला हवे.

अक्षरने मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात अफगाणिस्तानच्या दोन फलंदाजांना बाद केले. या सामन्यात त्याने केवळ 23 धावा दिल्या. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात त्याने चार षटकात केवळ 17 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. अक्षरने अशा विकेटवर गोलंदाजी केली, जिथे फलंदाजी करणे खूप सोपे आहे. तिथे अक्षरने फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत आणि विकेट्सही काढल्या.

या सामन्यात अक्षरने T20 मध्ये 200 बळी पूर्ण केले. अक्षरने 234 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. अक्षरच्या फलंदाजीवर नजर टाकली, तर त्याने अशा सामन्यांच्या 168 डावांमध्ये 22.52 च्या सरासरीने आणि 134.65 च्या स्ट्राइक रेटने 2545 धावा केल्या. जडेजाच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर जडेजाने एकूण 310 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 216 विकेट घेतल्या आहेत. आता जर आपण सामने आणि विकेटमधील फरक पाहिला, तर अक्षरचे आकडे चांगले दिसतात आणि जर अक्षरने हा वेग कायम ठेवला, तर तो 310 टी-20 सामन्यांमध्ये जडेजापेक्षा जास्त विकेट घेईल. जडेजाने 310 सामन्यांमध्ये 25.42 च्या सरासरीने आणि 129.33 च्या स्ट्राईक रेटने 3382 धावा केल्या. म्हणजेच आकडेवारीवर नजर टाकली, तर अक्षर जडेजापेक्षा टी-20 मध्ये अधिक प्रभावी असल्याचे दिसून येते.

एवढा प्रभावी खेळ करूनही जडेजापेक्षा अक्षरला पसंती मिळत नाही. त्याला संघातून वगळण्यात आले आहे. जडेजा असतो, तेव्हा अक्षरला बेंचवर बसावे लागते. या वर्षी टी-20 विश्वचषक होणार आहे आणि संघ व्यवस्थापन जडेजापेक्षा अक्षरला प्राधान्य देते की त्याच्यावर पुन्हा अन्याय होईल हे पाहणे बाकी आहे. T20 च्या दृष्टिकोनातून अक्षर जडेजापेक्षा सरस असल्याचे सिद्ध होत आहे.