हा कारनामा फक्त चीनच करू शकतो, ‘अदृश्य’ रुळांवरून चालवली ट्रेन


रुळांशिवाय ट्रेन धावू शकते असे कोणी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही म्हणाल, “मस्करी करत आहात का?” हे अजिबात खोटे नाही, हे आम्ही तुम्हाला सांगतो. मग तुम्ही छातीठोकपणे म्हणाल की हा पराक्रम फक्त चीनच करू शकतो. तुम्ही असा विचार करत असाल, तर तुम्ही अगदी बरोबर आहात.

वास्तविक, काही वर्षांपूर्वी चीनने ‘अदृश्य’ ट्रॅकवर धावणाऱ्या ट्रेनचे अनावरण केले होते. हे पाहून जगाला आश्चर्य वाटले. चिनी अभियंत्यांनी या ट्रेनसाठी व्हर्च्युअल ट्रॅक तयार करून या ट्रॅकवर धावणारी ट्रेन दाखवली होती. या ट्रेनची चाचणी चीनच्या हुनान प्रांतातील झुझोऊ येथे करण्यात आली होती, ती त्यावेळी यशस्वी झाली होती.

व्हर्च्युअल ट्रॅक ट्रेनची सुरुवात चीनमध्ये 2017 मध्ये झाली होती. आता चीनच्या रेल्वे विभाग सीआरआरसीने आपली ट्रेन 3 किलोमीटरने वाढवली आहे. ज्यामध्ये झुझो प्रांतातील 4 स्थानके जोडण्यात आली आहेत. या ट्रेनमध्ये बस आणि ट्रक सारखी स्टीयरिंग व्हील आहेत आणि ती पारंपारिक गाड्यांपेक्षा खूप वेगळी आहे. या ट्रेनमुळे प्रदूषण होत नाही आणि मेट्रो ट्रेनपेक्षा ती स्वस्त आहे, असेही चीनचे म्हणणे आहे.


व्हर्च्युअल ट्रॅक ट्रेनची वैशिष्ट्ये

  1. ही ट्रेन 30 मीटर लांब आहे आणि त्यात सेन्सर आहेत, जे रस्त्याची लांबी आणि रुंदी ओळखतात.
  2. ट्रेनमध्ये बसवलेल्या सेन्सर्सच्या मदतीने ही ट्रेन मेटल ट्रॅकशिवाय मार्गावर धावते.
  3. एआरटी ट्रेनमध्ये 300 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे आणि तिचा कमाल वेग ताशी 70 किलोमीटर आहे.
  4. ही ट्रेन 10 मिनिटांत चार्ज केल्यानंतर 25 किलोमीटरपर्यंत धावू शकते.