Box office : ‘सालार’ने धुऊन टाकला प्रभासचा फ्लॉपचा डाग, पण पोहचू शकला नाही शाहरुखच्या या चित्रपटापर्यंत


साऊथ सुपरस्टार प्रभासची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. त्याच्या चित्रपटांनाही तोड नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो एकही हिट चित्रपट देण्यात अपयशी ठरत होता. आता बऱ्याच काळानंतर प्रभास चांगला कमाई करणारा चित्रपट घेऊन आल आहे. सालार हा तोच चित्रपट आहे, जो आधीच्या फ्लॉप चित्रपटांचे डाग धुवून टाकेल. सालार रिलीज होऊन 18 दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाचे कलेक्शन काय आहे, ते जाणून घेऊया.

Sacnilk अहवालानुसार, Salaar ने 18 व्या दिवशी एकूण 2.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ही आकडेवारी आदल्या दिवसाच्या तुलनेत खूपच कमी आहे. पण, वीकेंडला चित्रपटाचा व्यवसाय पुन्हा वाढेल अशी अपेक्षा आहे. 18व्या दिवसाचे कलेक्शन समोर आल्यानंतर चित्रपटाने एकूण 395.50 कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले आहेत.

सलामीच्या दिवशी एकट्या भारतात 90 कोटी रुपये जमा करणारा सालार वर्ल्डवाइड देखील आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. जगभरात या चित्रपटाने 597.6 कोटी रुपयांची कमाई केली असून लवकरच हा 600 कोटींचा आकडा पार करेल. त्याच वेळी, चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 464.6 कोटी रुपये आहे. परदेशातही या चित्रपटाने 133 कोटींचा व्यवसाय केला आहे. सुमारे 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘सालार’ने एक दिवस आधी प्रदर्शित झालेल्या डंकीलाही मागे टाकले आहे.

सालारने त्याच्या पातळीवर ऐतिहासिक कलेक्शन केले असेल, पण शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड अजूनही अबाधित आहे. खरं तर, आम्ही बोलत आहोत, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण और जवान या चित्रपटाबद्दल. हे दोन्ही चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले होते. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की, आगामी काळात शाहरुखच्या दोन्ही बड्या चित्रपटांना मागे टाकण्यात प्रभासचा सालार यशस्वी होतो का?