तुम्ही ही स्कूटर चालवू शकता ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय, किंमतही जास्त नाही


जेव्हापासून केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केले आहेत. तेव्हापासून वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल लोकांना मोठी चलान भरावी लागत आहे. अनेकवेळा असे घडते की, तुम्ही दुचाकी घेऊन बाहेर जाताना, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स असलेले पाकीट घरीच विसरता. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी पकडल्यास चलान कापले जाते.

अशा समस्या लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी अशा इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत, जी रस्त्यावर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता भासणार नाही. जर तुम्हालाही ट्रॅफिक नियमांमध्ये अडकायचे नसेल, तर आम्ही तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती सांगत आहोत. जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.

ओकिनावा लाइट ओकिनावा लाइट इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250w मोटर आहे, जी ताशी 25 किमी वेगाने धावू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे तुम्ही एका चार्जमध्ये 60 किमीपर्यंतचे अंतर कापू शकता. जर तुम्हाला Okinawa Lite इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल, तर तुम्ही ती 66,993 रुपयांना खरेदी करू शकता.

Komaki XGT KM या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 56,890 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60v 28Ah बॅटरी आहे, जी 65 किमीची रेंज देते. या स्कूटरला चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात आणि तिचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे.

Hero Electric Optima LX Hero ही देशातील सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही 51,440 रुपयांना खरेदी करू शकता. Hero Electric Optima LX मध्ये 48V-2Ah लीड ऍसिड बॅटरी आहे, जी 60 किमी पर्यंतची रेंज देते. हीरो इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, ज्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे, अशा स्कूटर चालवण्यासाठी ना ड्रायव्हिंग लायसन्सची गरज आहे किंवा RTO मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर्सची नोंदणी करण्याची गरज नाही.