एआय व्हॉईस क्लोन स्कॅमची अशी पटवा ओळख, अन्यथा त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे होईल मोठे नुकसान


स्कॅमर आता लोकांची सायबर फसवणूक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा देखील वापर करत आहेत, ज्यामध्ये स्कॅमर तुमच्या मित्राचा, ओळखीचा किंवा नातेवाईकाचा आवाज क्लोन करतात आणि फोन कॉल करतात आणि तुम्हाला मदतीची विनंती करतात. बऱ्याच वेळा तुम्ही घोटाळेबाजांच्या सापळ्यात अडकता आणि फसवणुकीचे बळी ठरता.

अशा अनेक बातम्या तुम्ही नुकत्याच वाचल्या किंवा ऐकल्या असतील, ज्यामध्ये अशाच पद्धतीने व्हॉईस क्लोन करून कॉल करण्यात आले आणि मदत मागण्याच्या बहाण्याने घोटाळेबाजांनी लाखो रुपयांची फसवणूक केली. जर तुम्हाला या फंदात पडायचे नसेल, तर आम्ही तुम्हाला AI व्हॉईस क्लोन स्कॅम कसा ओळखायचा, ते सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही क्लोन केलेला व्हॉईस कॉल सहज ओळखू शकाल.

एआय व्हॉईस क्लोन कसा ओळखायचा

  • तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने अचानक तुम्हाला कॉल करून तात्काळ मदत मागितली, तर तुम्ही सावध राहावे. अशा परिस्थितीत, तुम्ही त्याला ताबडतोब मदत करणे टाळले पाहिजे आणि काही वेळाने त्याला त्याच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करुन आणि तुम्ही त्याला याबद्दल सांगा.
  • जर तुम्हाला अचानक तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा फोन आला, तर जो तुमच्याशी बऱ्याच काळापासून संपर्कात नाही. तसेच, जर त्याच्या आवाजात रोबोटिक आवाज किंवा कोणतीही कृत्रिम भावना असेल, तर आपण त्याला उत्तर देऊ नये.
  • जर तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा कॉल आला आणि तुम्हाला त्याच्या संभाषणाच्या टोनमध्ये बदल जाणवला, तर तुम्ही सावध व्हावे की हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हॉइस कॉल असू शकतो, जो तुमची फसवणूक करण्यासाठी केला गेला आहे.

एआय व्हॉईस क्लोन स्कॅमपासून कसे कराल स्वतःचे संरक्षण

  • जर तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून अनोळखी नंबरवरून कॉल आला किंवा व्हॉइस मेल किंवा व्हॉइस चॅट आला, तर तुम्ही त्याला उत्तर देऊ नका. हा AI व्हॉईस क्लोन स्कॅम असण्याची शक्यता आहे.
  • जेव्हा जेव्हा तुमच्या ओळखीची कोणीतरी तुम्हाला कॉल करते आणि फोनवर मदत मागते आणि तुम्हाला अनोळखी खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगते, तेव्हा तुम्ही सावध असले पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही पैसे ट्रान्सफर करू नका.