Chetak Electric Scooter : अथर-ओलाचे टेंशन वाढले ! बजाजची ही नवीन स्कूटर आली धूमाकुळ घालायला


बजाज ऑटोने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या आहेत. कंपनीने चेतक अर्बने आणि चेतक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर अनेक रंगांच्या पर्यायांसह लॉन्च केले आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये नवीन तंत्रज्ञान आणि अपग्रेडेड बॅटरी पर्याय आणण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाले तर, नवीन चेतक स्कूटरमध्ये तुम्हाला TFT डिस्प्ले, TBT नेव्हिगेशन सपोर्ट, कॉल मॅनेजमेंट आणि म्युझिक कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. एवढेच नाही तर तुम्हाला हिल होल्ड कंट्रोल आणि रिव्हर्स मोड सारख्या वैशिष्ट्यांसह हे नवीन मॉडेल मिळतील.

कंपनीने बजाज चेतकच्या या मॉडेलची किंमत 1 लाख 15 हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. तुम्हाला ही स्कूटर सायबर व्हाईट, कोअर्स ग्रे, इंडिगो मेटॅलिक ब्लू आणि ब्रुकलिन ब्लॅक अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये मिळेल.

जर तुम्हाला बजाज चेतक स्कूटरचे प्रीमियम मॉडेल घ्यायचे असेल, तर तुम्हाला 1 लाख 35 हजार रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील. ही स्कूटर हेझलनट, ब्रुकलिन ब्लॅक आणि इंडिगो मेटॅलिक ब्लू कलरमध्ये खरेदी करता येईल.

याशिवाय सेल्फ-कॅन्सलिंग ब्लिंकर, लेफ्ट आणि राईट कंट्रोल स्विच, स्टीयरिंग लॉक, इलेक्ट्रॉनिक हँडल आणि सीट स्विच यासारखे फीचर्सही उपलब्ध असतील. चेतकने एक गोष्ट पूर्वीसारखीच कायम ठेवली आहे आणि ती म्हणजे तुम्हाला ही नवीन स्कूटर फुल मेटल बॉडीसह मिळेल.

चेतकच्या नवीन मॉडेल्समध्ये 2.9kWh बॅटरीऐवजी 3.2kWh बॅटरी आहे. मोठी बॅटरी मिळण्याचा फायदा म्हणजे बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 127 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, स्कूटर 73kmph चा टॉप स्पीड देईल.

चेतक अर्बने आणि चेतक प्रीमियम स्कूटर्स बाजारात थेट एथर 450 रेंज आणि ओला एस1 रेंजशी स्पर्धा करतील. Ather रेंज 1,29,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर Ola ची S1 रेंज 89,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.