विमानांमध्येही असतो का रिव्हर्स गिअर? जाणून घ्या चालते एवढे मोठे विमान


ऑटो कंपन्या वाहनांमध्ये रिव्हर्स गिअर देतात, जेणेकरून गरज पडल्यास वाहन मागे घेता येईल. अनेकदा वाहनचालकांना वाहने मागे घ्यावी लागतात. अशा परिस्थितीत, रिव्हर्स गिअर खूप उपयुक्त आहे. ही सुविधा उपलब्ध नसती, तर धक्का मारूनच वाहन मागे घ्यावे लागले असते. तुम्ही याचा वापर कार, बस, ट्रक इत्यादींमध्ये होताना पाहिला असेल. आपण वाहनांबद्दल बोललो आहोत, पण आकाशात उडणाऱ्या विमानांनाही रिव्हर्स गिअर असतो की नाही?

विमान मागे घ्यायचे असेल, तर कसे घेणार? असो, विमानाचा आकार बराच मोठा असतो. ढकलून मागे नेणे शक्य असेल, तर विमान उत्पादक कंपन्या रिव्हर्स गियरची सुविधा देतात का? या प्रश्नाचे उत्तर पुढे वाचूया.

विमानात रिव्हर्स गिअर आहे का? या प्रश्नाचे थेट उत्तर ‘नाही’ असे आहे. विमानात रिव्हर्स गिअर नसतो. वाहनांमध्ये रिव्हर्स गिअर असल्याने वाहने मागेही घेता येतात. पण, विमान मागे घेण्याची गरज नसते. विमान फक्त पुढे चालवायचे असते.

विमान आकाशात उडत असेल आणि मागे जावे लागत असेल, तर त्याला वळसा घालावा लागतो. जेव्हा आकाश रिकामे राहते, तेव्हा विमान वळवले जाते आणि परत आणले जाते.

विमानाला मागे नेण्यासाठी, पायलट इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या गॅसला उलट दिशेने वळवतात. या प्रक्रियेला रिव्हर्स थ्रस्ट म्हणतात. धावपट्टीवर विमान थांबवण्यासाठी रिव्हर्स थ्रस्टचा वापर केला जातो. विमान धावपट्टीवरून खेचण्यासाठी टग ट्रकचा वापर केला जातो. टग ट्रकने विमानही मागे नेले जाते.

विमान उडवण्यासाठी पायलट इंजिन सुरू करतात. इंजिनमधून निघणारा गॅस टर्बाइन, ड्राईव्ह प्रोपेलर किंवा जेट इंजिन वळवतात. प्रोपेलर किंवा जेट इंजिनमधून बाहेर पडणारी हवा विमानाला पुढे ढकलते. यालाच थ्रस्ट म्हणतात.

उडण्यासाठी थ्रस्ट आणि लिफ्ट असणे आवश्यक असते. विमानाच्या पंखांचा वापर विमान उचलण्यासाठी केला जातो, म्हणजे लिफ्टसाठी. विमानाच्या पंखांचा आकार आणि कल असा असतो की जेव्हा हवा पंखांच्या आरपार वाहते, तेव्हा पंखांवर एक ऊर्ध्वगामी शक्ती निर्माण होते.

विमानाला जमिनीकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा अधिक शक्तिशाली झाल्यावर लिफ्टची शक्ती विमानाला आकाशात उचलते. लिफ्ट विमानाला उचलण्याचे काम करते. अशा प्रकारे विमान पुढे सरकते आणि उड्डाण करते.