Ind Vs Sa : नवीन वर्षात रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय, आपल्याच मित्राला संघातून बाहेर काढणार!


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना 3 जानेवारीपासून न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया येथे पोहोचली, तेव्हा येथे मालिका जिंकणार असे स्वप्न होते, पण हे स्वप्नही अधुरेच राहिले. कारण पहिल्या कसोटीतच टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता मालिकेतील दुसरी कसोटी आणि या वर्षातील पहिल्या कसोटीची वेळ आहे.

टीम इंडियाचा दुसरा सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे होणार आहे. कर्णधार रोहित शर्माला मालिका बरोबरीत आणायची असेल, तर त्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि या सामन्यात भारतीय संघ दोन मोठे बदल करू शकेल अशी अपेक्षा आहे.

पहिला बदल म्हणजे प्रसिध्द कृष्णाला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आणि त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळू शकते. रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यापूर्वी मुकेश कुमारसोबत सरावात बराच वेळ नेटमध्ये घालवला आहे, त्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय रवींद्र जडेजाच्या पुनरागमनाचा संघात आणखी एक बदल पाहायला मिळेल. कारण पहिल्या सामन्यापूर्वी जडेजाला काही समस्या होत्या, त्यामुळे तो खेळू शकला नाही. पण आता जडेजा तंदुरुस्त आहे, त्यामुळे तो प्लेइंग-11 मध्ये आला, तर रविचंद्रन अश्विनला बाहेर बसावे लागेल.

म्हणजेच टीम इंडिया हे दोन मोठे बदल करताना दिसू शकते. टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 4 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला होता.

अशी असू शकते भारताची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर,