नवीन वर्षात रोहित शर्मा खेळणार नवी इनिंग! संघाला विजय मिळवून देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत ते करावे लागले जे अद्याप नाही आले करता


भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 ते 28 डिसेंबर दरम्यान खेळला गेला, ज्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. या सामन्यात भारताला एका डावाने पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. जर टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल, तर रोहितला दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये जे केले नाही ते करावे लागेल.

भारताने हा सामना जिंकल्यास मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील. पण टीम इंडिया हरली, तर खूप नुकसान होईल. या पराभवामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताच्या मानांकनावर परिणाम होईल आणि अंतिम फेरीतील त्यांचा मार्ग कठीण होईल.

रोहित सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपली ताकद दाखवली आहे. पण एक गोष्ट अशी आहे जी दक्षिण आफ्रिकेत रोहितला अजून करता आलेली नाही. रोहितने दक्षिण आफ्रिकेत अजून एकही अर्धशतक झळकावलेले नाही. रोहितने 2013 पासून दक्षिण आफ्रिकेत पाच कसोटी सामने खेळले असून त्याने केवळ 128 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या 47 होती. रोहितची उंची पाहता हे आकडे योग्य वाटत नाहीत, पण हे वास्तव आहे. रोहित स्वतः ही आकडेवारी बदलू इच्छितो. रोहितला केपटाऊनमध्ये मोठी खेळी खेळून शतक झळकावायचे आहे. टीम इंडियाला या निर्णायक सामन्यात रोहितच्या या खेळीची नितांत गरज आहे. रोहितला नवीन वर्षाची सुरुवात दमदारपणे करायची आहे आणि नवी इनिंग सुरू करायची आहे.

रोहित हा असा फलंदाज आहे जो विकेटवर टिकून राहिल्यास सहजपणे मोठी खेळी खेळू शकतो आणि सामन्याचा मार्ग बदलू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना जिंकून भारताला आपला चेहरा वाचवायचा असेल, तर रोहितची फलंदाजी महत्त्वाची आहे. रोहित हा कर्णधार असून त्याला आघाडीतून संघाचे नेतृत्व करावे लागणार आहे. दुसऱ्या सामन्यात रोहितकडून मोठी धावसंख्या उभारण्याची टीम इंडियाची अपेक्षा आहे.