शुभमन गिलला टीम इंडियातून वगळण्याची का आहे गरज? ही 4 कारणे आहेत


शुभमन गिल…या फलंदाजाला विराट कोहलीचा उत्तराधिकारी मानला जातो. म्हणजे विराट हा जागतिक क्रिकेटचा बादशहा असेल, तर लोक शुभमन गिलला राजकुमार म्हणू लागले आहेत. हा उजव्या हाताचा फलंदाज अप्रतिम खेळाडू आहे, यात शंका नाही. या फलंदाजामध्ये स्वबळावर सामना जिंकण्याची ताकद आहे. पण या सगळ्या गोष्टी फक्त एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्येच खऱ्या वाटतात. कारण क्रिकेटच्या कठीण फॉरमॅटमध्ये शुभमन गिलने ज्या प्रकारची कामगिरी दाखवली आहे, ते पाहता काही औरच वाटते. परिस्थिती अशा पातळीवर आली आहे की, आता या खेळाडूला कसोटी संघातून वगळण्याची चर्चा आहे.

सेंच्युरियन कसोटी ही शुभमन गिलसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हती. दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला पहिल्या डावात 2 धावा करता आल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून 26 धावा आल्या होत्या. येथे मोठी गोष्ट अशी नाही की त्याला दोन्ही डावात मिळून 28 धावा करता आल्या. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुभमन गिल ज्या पद्धतीने बाद झाला आहे, ते पाहता तो कसोटी संघात येण्याच्या लायकीचा आहे, असे वाटत नाही. याची 4 मोठी कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

1. टेक्निकवर प्रश्नचिन्ह
शुभमन गिल हा उत्कृष्ट फलंदाज असला, तरी त्याची कसोटी सरासरी केवळ 31 आहे. हा आकडा 19 कसोटीनंतर टॉप ऑर्डर बॅट्समनसाठी खूप वाईट आहे. गिलचे हे आकडे थेट त्यांच्या टेक्निकवरही प्रश्न उपस्थित करतात. कसोटी क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी फूटवर्क आवश्यक आहे, पण हा खेळाडू त्यात अपयशी ठरला आहे. सध्या लाल चेंडूसह त्याचे टेक्निक फसले आहे.

2. कसोटीत जास्त आक्रमकता
खेळाडूने आक्रमक असणे ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळ्या पद्धतीने आक्रमकता आवश्यक असते. एकंदरीत, संतुलित दृष्टीकोन असणे महत्वाचे आहे परंतु शुभमन गिल प्रत्येक चेंडूवर धावा काढण्याचा प्रयत्न करतो. तर कसोटी क्रिकेटमध्ये चेंडू सोडणे हे खेळण्याइतकेच महत्त्वाचे आहे. या बाबतीत शुभमन गिल मागे राहिला आहे.

3. शुभमन दुरूनच खेळतो शॉट्स
शुबमन गिलची कसोटीतील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याचा ड्राईव्ह. शुभमन गिल चेंडूवर खूप दूरवरुन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करतो, जे एकदिवसीय आणि टी-20 मध्ये ठीक आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये हे त्याच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. विशेषत: ज्या विकेटवर बॉल सीम केला जात आहे, जिथे भरपूर बाउंस आहे, गिलची ही रणनीती अत्यंत वाईट आहे. यामुळेच गिल अनेकदा स्लिपमध्ये बाद होतो. लाल चेंडूला जास्त स्विंग आणि सीम असतो आणि तो डोळ्याखाली खेळायचा असतो, पण शुभमनच्या तंत्रात हा महत्त्वाचा पैलू दिसत नाही.

4. खूप वाईट आहे आकडेवारी
शुभमन गिलला कसोटी क्रिकेटमध्ये खूप संधी मिळाल्या आहेत. पहिली मालिका सोडली, तर त्यानंतर त्याने निराशा केली आहे. आता गिलची आकडेवारी अशी आहे की त्याला संघात स्थान मिळत नाही. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाने त्याच्या पर्यायांकडे लक्ष दिले पाहिजे, ज्यामध्ये अभिमन्यू ईश्वरन हे मोठे नाव आहे.