सौदीच्या राजाच्या विधवेने जिंकली मोठी ‘लढाई’, अशी मिळवली अब्जावधींची संपत्ती


सौदी अरेबियाचे दिवंगत राजे फहद बिन अब्दुलअजीझ अल-सौद जे एके काळी जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये होते, त्यांच्या विधवा पत्नीला अनेक वर्षांपासून मालमत्तेच्या वादात अडकावे लागले. पण ते म्हणतात ना अंत भला तो सब भला, तसेच काहीसे त्यांच्यासोबतही तेच घडले. सौदी राजाच्या विधवेने ही मोठी लढाई जिंकली आहे आणि अशा प्रकारे तिला लंडनच्या प्रसिद्ध ‘बिलियनेअर रो’मध्ये असलेली ही मालमत्ता परत मिळाली आहे.

लंडनमधील या रस्त्याचे अधिकृत नाव ‘द बिशप अव्हेन्यू’ आहे, ज्याला सामान्य लोक ‘बिलियनेअर्स स्ट्रीट’ असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे या रस्त्यावर एकूण 66 घरे असून यातील बहुतांश घरे अब्जाधीश उद्योगपतींची आहेत. या यादीत ‘स्टील किंग’ लक्ष्मी मित्तल, ब्रुनेईचा सुलतान आणि मीडिया मोगल रिचर्ड डेसमंड यांसारख्या लोकांचा समावेश आहे.

किंग फहद बिन अब्दुलअजीझ अल सौद यांनी 1974 मध्ये अस्तुरियन फाउंडेशन नावाची संस्था तयार केली. केन्स्टेड हॉलसह बिशप अॅव्हेन्यूवरील या मोठ्या घराचा ताबा देण्यात आला. ब्रिटीश न्यायालयाने या मालमत्तेवरील अस्तुरियन फाउंडेशनचा दावा फेटाळला. अशाप्रकारे अब्जावधी पौंड किमतीच्या या संपत्तीवर सौदी अरेबियाच्या राजघराण्याचा हक्क परत मिळाला आहे.

या मालमत्तेचा वाद सौदी राजघराण्यातील उत्तराधिकाराशी संबंधित विवादांवर प्रकाश टाकतो. सामान्यतः रॉयल फॅमिली त्याच्या मालमत्तेबद्दल आणि अंतर्गत विवादांबद्दल खूप खाजगी राहते. लंडनमधील हे घर हा मालमत्तेशी संबंधित मोठा वाद होता, कारण त्यासोबत फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील सौदी राजाच्या इतर मालमत्तांचाही समावेश होता.

2005 मध्ये किंग यांच्या निधनानंतर या मालमत्ताही संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. आता ही मालमत्ता राजाची विधवा अल जवाहरा बिंत इब्राहिम अब्दुल अजीज अल इब्राहिम यांच्याकडे आली आहे.