‘बलात्कार हा बलात्कारच असतो… जरी नवऱ्याने केला तरीही’, वैवाहिक बलात्कारावर गुजरात हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय


बलात्कार हा गंभीर गुन्हा असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जरी हा गुन्हा पीडितेच्या पतीने केला असेल तरी देखील. उच्च न्यायालयाने सांगितले की, जगातील अनेक देशांमध्ये वैवाहिक बलात्कार बेकायदेशीर मानला जातो. न्यायमूर्ती दिव्येश जोशी म्हणाले की, बलात्कार हा बलात्कारच असतो… जरी तो नवऱ्याने केला असला तरीही. गेल्या 8 डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयात न्यायमूर्ती जोशी यांनी महिलेचा जामीन अर्ज फेटाळला होता.

या महिलेवर तिच्या मुलाला तिच्या सुनेवर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. 8 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती जोशी यांनी सांगितले की, अमेरिकेतील 50 राज्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, इस्रायल, फ्रान्स, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, सोव्हिएत युनियन, पोलंड आणि चेकोस्लोव्हाकिया आणि इतर अनेक राज्यांमध्ये वैवाहिक बलात्कार बेकायदेशीर आहे.