Mitchell Starc: 1 तासात मोडला कमिन्सचा विक्रम, 24.75 कोटींना विकला गेला हा खेळाडू, ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू


इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या मिनी ऑक्शनमध्ये मोठे रेकॉर्ड बनले आहेत, लिलावाच्या पहिल्या सहामाहीत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स 20.50 कोटी रुपयांना विकला जाऊन सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण अवघ्या एका तासानंतर हा विक्रमही मोडला, आता ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले आहे.

मिशेल स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सने त्याच्यासाठी मोठ्या बोली लावल्या. सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सनेही मिचेल स्टार्कसाठी बोली लावली होती, पण जेव्हा ते बजेट ओलांडून गेले, तेव्हा हे दोन्ही संघ मागे राहिले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये फक्त दोन सीझन खेळले आहेत, शेवटची वेळ तो 2015 मध्ये आयपीएल खेळला होता. यानंतर मिचेल स्टार्क कधीही आयपीएल खेळला नाही आणि आता जेव्हा त्याने वर्ल्ड कपनंतर पुनरागमनाची घोषणा केली, तेव्हा त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. मिचेल स्टार्कने आयपीएलमध्ये 27 सामने खेळले असून त्यात त्याने 34 विकेट घेतल्या आहेत.

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, जेसन रॉय, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, सुयश शर्मा, हर्षित राणा, सुनील नरेन, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.

  • केएस भारत- 50 लाख (आधारभूत किंमत 50 लाख)
  • चेतन साकरिया- 50 लाख (आधारभूत किंमत 50 लाख)
  • मिचेल स्टार्क – 24.75 कोटी (आधारभूत किंमत 2 कोटी)