Tips and Tricks : चुकून दुसऱ्याच्या नंबरवर ट्रान्सफर झाले पैसे? अशा प्रकारे मिळतील परत


ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना अनेक वेळा घाईगडबडीत चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात आणि अशा परिस्थितीत टेंशन सुरू होते. चुकीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केल्यानंतर, माहितीच्या अभावामुळे, अनेकांना पैसे कसे परत मिळावावे, हे माहित नसते. आपल्या मनात प्रश्न घुमू लागतात जसे की, ज्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहते, त्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, मग कोण आपले पैसे का परत करेल?

पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. पैसे परत मिळवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, फक्त खाली दिलेल्या स्टेप्स लक्षात ठेवा.

सर्वप्रथम, तुम्हाला NPCI लिहून Google वर शोधायचे आहे, शोध परिणाम दिसल्यानंतर, पहिल्या लिंकवर क्लिक करा. NPCI ची अधिकृत साइट उघडल्यानंतर, तुम्हाला वरच्या डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेनूवर क्लिक करावे लागेल.

तुम्ही थ्री डॉट मेनू आयकॉनवर क्लिक करताच तुमच्यासमोर अनेक पर्याय उघडतील, तुम्हाला तळाशी असलेल्या गेट इन टच विभागात जावे लागेल. या विभागात तुम्हाला UPI तक्रार पर्यायावर क्लिक करावे लागेल.

UPI कम्प्लेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन ऑप्शनवर जावे लागेल, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील. स्क्रीनवर विचारलेल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे भरल्यानंतर सबमिट करा.

UPI तक्रार दाखल केल्यानंतर, तुमचे पैसे काही तासांत तुम्हाला परत मिळतील. अशा प्रकारे, भारत सरकारच्या या अधिकृत साइटच्या मदतीने, तुम्ही चुकीच्या खात्यात हस्तांतरित केलेले पैसे परत मिळवू शकता.