
‘फ्रेंड्स’ फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या घराच्या गरम बाथटबमध्ये बुडलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्यानंतर मॅथ्यू पेरीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाल्याची बातमी आली. पण, आता त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे. नुकताच मॅथ्यूचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे.
उलगडले ‘फ्रेंड्स’ फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचे रहस्य, शवविच्छेदन अहवालात उघड
मॅथ्यू पेरी याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले आहे. अहवालानुसार, पेरीच्या रक्तातील केटामाइनची पातळी सामान्यतः शस्त्रक्रियेमध्ये भूल म्हणून वापरल्या जाणाऱ्या उच्च पातळीइतकी होती. यामुळे जलद हृदयाचे ठोके आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्याच वेळी, यामुळे पेरी बेशुद्ध होऊ शकत होता, त्यानंतर बुडून मृत्यू होऊ शकत होता.
सामान्यतः, डॉक्टर हे औषध ऍनेस्थेटिक म्हणून देखील वापरू शकतात. संशोधक मानसिक आरोग्य उपचार म्हणून त्याचा वापर शोधत आहेत. पेरीने त्याच्या एका पुस्तकात या औषधाच्या सेवनाचा उल्लेखही केला होता. मात्र, पेरीने केटामाइनचा डोस कधी आणि कसा घेतला, हे या अहवालात स्पष्ट झालेले नाही. पण, त्याचे काही कण त्याच्या पोटात नक्कीच सापडले. पेरीच्या घरी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांपेक्षा काही वेगळ्या गोळ्या होत्या.
याशिवाय त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल आढळले नसल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आढळून आले आहे. तसेच कोकेन, हेरॉइन किंवा फेंटॅनाइल यांसारख्या इतर ड्रग्सचे कोणतेही ट्रेस आढळले नाहीत.
