स्मृती मंधानाच्या डोक्याला झाली दुखापत आणि फलंदाज झाली आऊट, लाईव्ह मॅचमध्ये घडले आश्चर्यकारक, टळली मोठी दुर्घटना


भारतीय महिला क्रिकेट संघ फार कमी कसोटी सामने खेळतो. टीम इंडियाने 2021 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामने खेळले. यानंतर यंदा हा संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ दाखवत पहिल्या डावात दमदार धावसंख्या उभारली. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला मोठी धावसंख्या करू दिली नाही आणि 136 धावांत गुंडाळले. यादरम्यान टीम इंडियाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना क्षेत्ररक्षण करताना जखमी झाली आणि त्यानंतर तिला मैदान सोडावे लागले.

भारताने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. टीम इंडियाने पहिल्या डावात 428 धावा केल्या होत्या. या प्रचंड धावसंख्येच्या दबावाखाली इंग्लंडचा संघ विस्कळीत झाला आणि स्वस्तात गडगडला. भारताने पुन्हा इंग्लंडला फॉलोऑन न दिल्याने दुसरा डाव खेळायला आला. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 292 धावांची आघाडी घेतली.

इंग्लंडच्या डावातील 30 वे षटक सुरू होते. दीप्ती शर्मा गोलंदाजी करत होती. एमी जोन्सने ओव्हरचा चौथा चेंडू खेळला. शॉर्ट लेगवर सरळ उभ्या असलेल्या स्मृती मंधानाला जोन्सचा फटका अतिशय वेगात आला आणि चेंडू तिच्या डोक्याला लागला. मात्र, मंधानाने हेल्मेट घातले होते. त्यामुळे तिला फारशी दुखापत झाली नाही, पण चेंडू तिच्या हेल्मेटला लागून हवेत गेला आणि शेफाली वर्माने तो झेल घेतला. एमी जोन्स 12 धावा करून बाद झाली. त्यानंतर मंधानाला कंसशन टेस्टसाठी बाहेर नेण्यात आले. तिला गंभीर दुखापत झाली नसल्याचे आढळून आले. दुसऱ्या डावातही ती फलंदाजीसाठी उतरली.

भारताची फिरकीपटू दीप्ती शर्माने इंग्लंडला स्वस्तात बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. दीप्तीने केवळ 5.3 षटके टाकली आणि सात धावांत पाच बळी घेतले. यादरम्यान तिने इंग्लंडच्या बड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दीप्तीने डॅनी व्याट आणि सोफी एक्लेस्टनसारख्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिच्याशिवाय स्नेह राणाने दोन गडी बाद केले. रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.