Smoke Bomb : स्मोक बॉम्बमुळे बिघडू शकते आरोग्य, या अवयवांवर होतो परिणाम


संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी एक मोठी घटना घडली. संसदेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी संसदेच्या गॅलरीत उड्या मारून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी तरुणांनी स्मोक बॉम्बचा वापर केला. त्यामुळे संसद परिसरात धुराचे वातावरण होते. स्मोक बॉम्बच्या आतून लाल आणि पिवळा धूर निघत होता. स्मोक बॉम्ब फेकणारे तरुण पकडले गेले, मात्र या बॉम्बमधून निघणाऱ्या धुरामुळे काही खासदारांना डोळ्यांची जळजळही झाली.

गेल्या काही वर्षांपासून स्मोक बॉम्बचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जात आहे, विशेषत: ज्या भागात निदर्शने होतात. याचा वापर संसदेतही केला गेला आहे, पण तुम्हाला माहित आहे का की स्मोक बॉम्ब आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतो. याबद्दल डॉक्टरांकडून जाणून घेऊया.

स्मोक बॉम्बच्या आतील धुरामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. यामुळे काही लोकांच्या डोळ्यांत जळजळ, डोळ्यांतून पाणी येणे आणि अंधुक दृष्टी येऊ शकते. जर स्मोक बॉम्बचा धूर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांपर्यंत अगदी जवळून पोहोचला असेल, तर त्याला सतत डोळ्यातून पाणी येण्याची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

जर एखाद्या व्यक्तीला आधीच डोळ्यांची कोणतीही समस्या असेल आणि डोळ्यात धूर गेला, तर नंतर डोळ्यांना ऍलर्जी होऊ शकते आणि जळजळ होण्याची समस्या दीर्घकाळ टिकते. मात्र, संसदेच्या संकुलात फेकण्यात आलेल्या स्मोक बॉम्बमधून निघणारा धूर हानीकारक असेलच असे नाही.

स्मोक बॉम्बच्या धुरामुळे काही काळ खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मात्र, स्मोक बॉम्बमधून कोणत्या प्रकारचा धूर निघतो यावर ते अवलंबून आहे. कारण सर्व स्मोक बॉम्बचा धूर हा विषारी किंवा धोकादायक नसतो.

परंतु स्मोक बॉम्बमधून निघणारा धूर धोकादायक असेल आणि श्वासासोबत फुफ्फुसात गेला, तर खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तथापि, बहुतेक प्रकरणांमध्ये, ज्यांना आधीच गंभीर श्वसनाचे आजार आहेत, त्यांनाच स्मोक बॉम्बच्या धुराचा फटका बसतो.

स्मोक बॉम्बमध्ये वेगवेगळ्या रंगाचा धूर निघतो. हा हिरवा, लाल आणि पिवळ्या रंगाचा असतो. बुधवारी संसदेत फेकण्यात आलेल्या स्मोक बॉम्बमधून लाल आणि पिवळा धूर निघत होता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही