Bike Tips : बाइक देईल उत्तम मायलेज, गाडी चालवताना लक्षात ठेवा या गोष्टी


बाईक, स्कूटर किंवा कार, जेव्हाही आपण नवीन खरेदी करायला जातो, तेव्हा सर्वप्रथम विचारतो की, बाईक एका लिटरमध्ये किती मायलेज देते? काही लोक बाईक विकत घेतल्यानंतर मोटरसायकल अशा प्रकारे चालवतात की त्यांना बाईकमधून योग्य मायलेज मिळत नाही, त्यामुळे पेट्रोलच्या वाढत्या दराचा भार थेट त्यांच्या खिशावर पडतो.

आज आम्‍ही तुम्‍हाला काही महत्‍त्‍वाच्‍या पण उपयोगी टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्‍ही तुमच्‍या बाईकचे मायलेज वाढवू शकता. जर तुम्ही खाली नमूद केलेल्या गोष्टींची काळजी घेतली, तर तुमची बाईक तुम्हाला नेहमीच चांगला मायलेज देईल.

तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की काहीही झाले तरी बाईकची सर्व्हिस नेहमी वेळेवर पूर्ण करा. ही एक गोष्ट केल्याने तुम्हाला दोन फायदे होतील, एक म्हणजे तुम्हाला चांगले मायलेज मिळेल आणि दुसरे म्हणजे तुमच्या बाईकचा परफॉर्मन्सही चांगला राहील.

टायरमध्ये हवा कमी असो वा जास्त, दोन्ही बाबतीत बाइक चांगले मायलेज देऊ शकत नाही आणि टायर लवकर खराब होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बाईकचे चांगले मायलेज हवे असेल, तर टायरमधील हवा वेळोवेळी तपासत राहा आणि त्यात योग्य प्रमाणात हवा भरा.

तुम्हालाही वाटेल की इंधन सर्वत्र उपलब्ध आहे, मग योग्य इंधन भरा हा प्रश्न का? असे नाही, पुढच्या वेळी पेट्रोल भरताना मशीनवरची घनता नक्की तपासा. सरकारने केवळ पेट्रोलसाठीच नाही, तर डिझेलसाठीही घनतेचे मापदंड निश्चित केले आहेत. विहित मानकानुसार, पेट्रोलची घनता 730 ते 800 किलोग्रॅम प्रति घनमीटर असावी.

जर कोणी तुम्हाला विहित मर्यादेपेक्षा कमी घनतेचे पेट्रोल विकत असेल, तर तुमची बाईक देखील चांगले मायलेज देणार नाही, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत, अधिक चांगल्या मायलेजसाठी, घनता तपासल्यानंतरच पेट्रोल भरा.