Team India : 4 सामन्यात 10 विकेट, तरी देखील मिळाली नाही संधी ! संपुष्टात आली का या खेळाडूची कारकीर्द?


एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघ आपल्या नव्या मिशनसाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया मालिका संपणार आहे, पण सर्वांच्या नजरा फक्त 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाने तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केला आहे, मात्र एका खेळाडूला त्यात स्थान मिळालेले नाही, त्यामुळे बीसीसीआयवर बरीच टीका होत आहे. येथे आम्ही भुवनेश्वर कुमारबद्दल बोलत आहोत, जो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे, पण तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने नोव्हेंबर 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता, परंतु सध्या तो विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे, जिथे त्याची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 4 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत, या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 5 पेक्षा कमी आहे. येथे त्याने एका सामन्यात 4 विकेट्स देखील घेतल्या आहेत. म्हणजे भुवनेश्वर कुमार त्याच्या जुन्या रंगात दिसत आहे, तरीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनीही भुवनेश्वर कुमारच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. आशिष नेहरा म्हणतो की, भुवीची किमान टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड व्हायला हवी होती, कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर तो उपयुक्त ठरू शकतो.

भुवीबद्दल बोलायचे झाले तर, तो गेल्या एक वर्षापासून टीम इंडियामध्ये परत येऊ शकला नाही, दरम्यान तो जखमीही झाला होता. मात्र टी-20 फॉरमॅटमध्ये नवीन गोलंदाज आल्याने भुवनेश्वर कुमारचा पत्ता कापला गेला. त्यामुळेच याआधी मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भुवीला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही आणि आता भुवीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही जागा मिळालेली नाही. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमारला वयाच्या 33 व्या वर्षी पुनरागमन करणं कठीण दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया – यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.