जोडले गेले रजनीकांतसोबत नाव, सासरच्या घरातून पळून ती बनली एडल्ट स्टार, या वादग्रस्त दक्षिणात्य अभिनेत्रीचे किस्से आहेत खूप रंजक


दक्षिणेतील कोणत्याही बोल्ड सौंदर्याचा विचार केला, तर दिवंगत अभिनेत्री सिल्क स्मिताचे नाव या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर गणले जाते. होय, सिल्क स्मिता ही साऊथ सिनेसृष्टीतील अतिशय वादग्रस्त अभिनेत्री मानली जात होती. आज तिची जयंती. आज ती आपल्यात असती तर तिचा 63 वा वाढदिवस साजरा करत असती. या खास प्रसंगी, आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील अशा कथांची ओळख करून देणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील.

सिल्क स्मिताच्या आयुष्यातील किस्से आणि चर्चा एवढ्या प्रसिद्ध होत्या की तिच्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत एक चित्रपटही तयार झाला होता. 2011 मध्ये रिलीज झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा तिचा बायोपिक आहे. विद्या बालनने या चित्रपटात सिल्कची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. विद्याने सिल्कला पडद्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि परिणामी तिचा अभिनय लोकांना खूप आवडला. तिच्या मृत्यूपर्यंतच्या संघर्षाचा प्रत्येक पैलू चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे.

मेकअप आर्टिस्ट बनली अभिनेत्री
यापूर्वी तिने इंडस्ट्रीत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले होते. यानंतर तिने हळूहळू हिरोईनच्या चेहऱ्यावर टच अप करायला सुरुवात केली. यानंतर तिची निर्मात्याशी मैत्री सुरू झाली आणि तिला चांगले फळ मिळाले. 1979 मध्ये तिने पहिला मल्याळम चित्रपट ‘एनाये थेडी’ केला. तिने आपल्या जादूने लोकांना वेड लावले. तिची मागणी वाढल्याने चित्रपट वितरकांनी सिल्कचा आयटम नंबर नसेल, तर ते चित्रपट विकत घेणार नाहीत, अशी मागणी करू लागले.

10 वर्षांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपट
यामुळेच सिल्कने आपल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये 360 चित्रपट केले. जेव्हा ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती, तेव्हा तिचे नाव अनेक बड्या स्टार्ससोबत जोडले गेले होते. रजनीकांत हे त्यापैकी एक होते, ज्यांच्यासोबत सिल्क अफेअरच्या चर्चा प्रसिद्ध होत्या. त्याचवेळी सिल्कने कमल हासन, रजनीकांत आणि चिरंजीवी यांसारख्या बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली होती.

कसा झाला सिल्कचा मृत्यू?
त्यानंतर तिच्या आयुष्यात एक असा टप्पा आला, जेव्हा तिच्या जवळच्या मित्राने तिला निर्माता बनून पैसे कमवण्याचे आमिष दाखवले. त्यांनी दोन चित्रपट केले आणि ते तोट्यात गेले. स्टारडमच्या शिखरावर असताना सिल्कला एकटे वाटू लागले. तिला हळूहळू नैराश्याचा त्रास होऊ लागला आणि ती मानसिकदृष्ट्या कमकुवत झाली. एवढेच नाही, तर ती दारूच्या आहारी जाऊ लागली. त्यानंतर 23 सप्टेंबर 1996 रोजी तिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या निधनाने इंडस्ट्रीत खळबळ उडाली.