पेटीएम-फोनपे रिचार्जसाठी घेत आहेत पैसे? अतिरिक्त पैसे न भरता कसे करावे रिचार्ज


जर तुम्ही ऑनलाइन मोबाइल रिचार्ज करत असाल, तर तुम्हाला याची जाणीव असणे आवश्यक आहे की कॅशबॅक देण्याऐवजी, थर्ड पार्टी अॅप जसे की Google Pay, PhonePe आणि Paytm मोबाइल रिचार्जसाठी तुमच्याकडून अतिरिक्त पैसे आकारतात. जर तुम्हालाही जास्तीचे पैसे देऊन कंटाळा आला असेल, तर आज आम्ही एक उपाय घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी एक रुपयाही जादा द्यावा लागणार नाही.

तुमच्याकडे रिलायन्स जिओ सिम असो किंवा एअरटेल किंवा व्होडाफोन आयडिया उर्फ ​​Vi कंपनीचा नंबर असो, जर तुम्ही खाली नमूद केलेल्या पद्धतीने तुमचा नंबर रिचार्ज केला, तर तुम्हाला मोबाईल रिचार्जवर एक रुपयाही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

रिलायन्स जिओ वापरकर्ते इन्स्टॉल करु शकतात हे अॅप
जर तुम्ही रिलायन्स जिओचे प्रीपेड वापरकर्ते असाल आणि आतापर्यंत तुम्ही फोन पे, पेटीएम किंवा गुगल पे द्वारे तुमचा नंबर रिचार्ज करत असाल, तर हे अॅप्स सोडा आणि कंपनीचे अधिकृत अॅप My Jio वापरा. रिलायन्स जिओच्या या अधिकृत अॅपद्वारे जिओ नंबर रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

एअरटेल वापरकर्त्यांनी फोनमध्ये इंस्टॉल करावे हे अॅप
तुमच्याकडे एअरटेल प्रीपेड सिम असल्यास, पुढच्या वेळी तुम्ही तुमचा मोबाइल नंबर रिचार्ज करण्यासाठी Airtel Thanks अॅप वापरा. एअरटेलचे हे अधिकृत अॅप तुमच्याकडून रिचार्जसाठी एक रुपयाही अतिरिक्त आकारणार नाही.

Vi वापरकर्त्यांसाठी हे अॅप वाचवेल पैसे
जर तुम्ही Vodafone Idea अर्थात ​​Vi कंपनीचे प्रीपेड वापरकर्ते असाल आणि प्रत्येक वेळी पेटीएम, फोनपे किंवा Google Pay सारख्या अॅप्सना रिचार्जसाठी अतिरिक्त पैसे देऊन थकले असाल, तर Google Play Store किंवा Apple च्या App Store वरून Vi App डाउनलोड करा. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा नंबर रिचार्ज करताना अतिरिक्त पैसे भरण्याच्या त्रासापासून स्वत:ला दूर ठेवू शकाल.