ऑनलाइन फसवणुकीपासून सावधान! अनोळखी नंबरवरून वारंवार कॉल येत आहेत? होऊ शकते आर्थिक फसवणूक


ऑनलाइन फसवणुकींच्या घटना झपाट्याने वाढत आहेत, घोटाळेबाज लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स वापरत आहेत. तुम्हाला अनोळखी नंबरवरून वारंवार कॉल येत असल्यास किंवा तुम्ही कॉल उचलल्यावर कॉल वारंवार डिस्कनेक्ट होत असल्यास, तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आतापर्यंत असे अनेक अहवाल समोर आले आहेत, ज्यात ओटीपीशिवाय मिस्ड कॉलद्वारे फसवणूक करणाऱ्यांनी लोकांना लुटण्यास सुरुवात केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल की OTP शिवाय कसे? आत्तापर्यंत अशी काही प्रकरणे समोर आली आहेत की जेव्हा लोकांना कॉल आला, तेव्हा त्यांनी कॉल उचलला पण आवाज न येता कॉल डिस्कनेक्ट झाला, त्यानंतर हा सिलसिला सुरू राहिला आणि वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत राहिले.

काही लोकांनी दोन ते तीन वेळा फोनही उचलला, पण आवाज आला नाही आणि मग एक मेसेज आला, जो पाहून लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ओटीपीशिवाय फक्त एका कॉलने खाते साफ करण्यात आले.

ओटीपी कोणाशीही शेअर करू नका किंवा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, असे अनेकदा सांगितले जाते, परंतु काही प्रकरणे अशी आहेत की लोकांनी यापैकी काहीही केले नाही आणि फक्त कॉल उचलल्याने खाते रिकामे झाले. अनेक अहवालांमध्ये असे नमूद केले आहे की जर एखाद्याला आंतरराष्ट्रीय नंबरवरून वारंवार कॉल येत असतील, तर तो नंबर उचलू नका किंवा परत कॉल करू नका.

टाळण्यासाठी या पद्धतींचे करा अनुसरण

  • जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल येत असेल, तर त्या नंबरवर परत कॉल करू नका.
  • जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून वारंवार मेसेज किंवा कॉल येत असतील, तर याबाबत कस्टमर केअरकडे तक्रार करा.
  • डेबिट-क्रेडिट कार्ड आणि बँक खात्यासाठी मजबूत पासवर्ड तयार करा.