शवागारात 100 हून अधिक महिला आणि मुलींच्या मृतदेहांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा जल्लाद


100 हून अधिक महिला आणि मुलींच्या मृतदेहांसोबत सेक्स करणाऱ्या डेव्हिड फुलरची ही हृदयद्रावक कथा आहे. वास्तविक, हा असा आजार आहे ज्यामुळे पीडित व्यक्तीला मृत शरीरासोबत संभोग करण्यात आनंद मिळतो. या आजाराला ‘नेक्रोफिलिया’ म्हणतात.

फुलर ‘नेक्रोफिलिया’ या आजाराने ग्रस्त होता, हे 2020 मध्ये उघड झाले, जेव्हा पोलिस दुसऱ्या प्रकरणाचा तपास करत होते. हा खटला 1987 मध्ये दोन महिलांच्या हत्येशी संबंधित होता. डेव्हिडच्या भूमिकेची चौकशी सुरू झाल्यावर त्याचा डीएनए नमुना घेण्यात आला. यावेळी त्याला ‘नेक्रोफिलिया’ या आजाराने ग्रासल्याचे आढळून आले.

त्यानंतर तपास अधिकाऱ्यांना डेव्हिडच्या घरातून अशी लाखो छायाचित्रे सापडली, ज्यामध्ये तो महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत होता. यामध्ये एका व्हिडिओचाही समावेश आहे ज्यामध्ये तो शवागारात महिला आणि मुलींसोबत सेक्स करताना दिसत होता. ही छायाचित्रे आग्नेय इंग्लंडमधील रुग्णालयांतील शवागारांची होती. डेव्हिड येथे काम करायचा.

हत्येच्या दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर आता 69 वर्षीय फुलरच्या सुटकेची कोणतीही शक्यता नाही. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ब्रिटीश सरकारने केलेल्या 308 पानांच्या तपासाचा उद्देश डेव्हिड हे सर्व कसे करू शकला, हे जाणून घेणे आहे. तसेच तो कधी कोणाच्या नजरेत का आला नाही? भविष्यात अशा घटना घडण्यापासून कसे रोखता येईल, हेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

फुलर हा सुरुवातीपासूनच कुख्यात चोर होता, पण तो जिथे कामाला गेला, तिथे त्याने आपला गुन्हेगारी रेकॉर्ड लपवला होता. त्याची ही हुशारी रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आली नाही आणि त्याला कामावर घेण्यात आले. 1987 मध्ये ज्या ससेक्स हॉस्पिटलमध्ये त्याने दोन महिलांची हत्या केली होती, ते आता बंद करण्यात आले आहे. दोन हत्येचे ते प्रकरण 33 वर्षे सोडवले जाऊ शकले नाही, कारण फुलरने खून केल्यानंतर लगेचच हॉस्पिटल बदलले.

ब्रिटीश सरकारला त्याच्या तपासात असे आढळून आले आहे की फुलरने 2005 ते 2020 दरम्यान म्हणजे जवळपास 15 वर्षांमध्ये किमान 101 मुली आणि महिलांच्या मृतदेहांसोबत घृणास्पद कृत्ये केली. ब्रिटनच्या तपास यंत्रणेने पुरावा म्हणून सर्व गुन्ह्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओही सादर केले आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की फुलरने कामाच्या वेळेत त्याचे गुन्हे केले, जेव्हा बरेच कर्मचारी शवगृहात असायचे. मात्र, तो का पकडला गेला नाही, हे तपासात कळू शकले नाही.

डेव्हिड फुलर इतका धूर्त होता की कोणत्या कारणामुळे कोणत्या स्त्री किंवा मुलीला आपला जीव गमवावा लागला, हे शोधण्यासाठी तो प्रथम लॉग बुक तपासायचा. विशेष म्हणजे ज्या लोकांबद्दल त्याला माहीत होते, की त्या अनोळखी महिलेचा किंवा मुलीचा कोणत्यातरी संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, अशा लोकांशी त्याने शारीरिक संबंध ठेवणे टाळले.