भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी 5 सीटर आणि 7 सीटर दोन्ही पर्याय आहेत. ज्यांचे कुटुंब मोठे आहे ते कमी किमतीत 7 सीटर पर्याय शोधत असतात. जर तुम्ही नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला तीन स्वस्त 7 सीटर मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत.
7 Seater Cars : कमी बजेटमध्ये 3 सर्वोत्कृष्ट 7 सीटर पर्याय, सुरक्षा रेटिंग देखील 4 स्टार
नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी ग्राहक केवळ वाहनातील अत्याधुनिक फीचर्सबद्दलच विचारत नाहीत, तर आता सुरक्षितता लक्षात घेऊन ग्राहकांनी सेफ्टी रेटिंगशी संबंधित प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली आहे.
Renault Triber
ही केवळ पॉकेट फ्रेंडली 7 सीटर कार नाही, तर रेनॉल्टची सर्वाधिक विक्री होणारी कार देखील आहे. या कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 4 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. या वाहनात 8-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मस्त ग्लोव्ह बॉक्स आहे. या कारची किंमत 6 लाख 34 हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, जी 8 लाख 98 हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
Maruti Suzuki Eritga
मारुती सुझुकीच्या या बेस्ट सेलिंग 7 सीटर कारच्या 14 हजारांहून अधिक युनिट्स गेल्या ऑक्टोबरमध्ये विकल्या गेल्या होत्या. या कारमघ्ये 7 इंच टचस्क्रीनसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्ले सपोर्टसह ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, ब्रेक असिस्ट आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला थ्री स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे, या कारची किंमत 8.64 लाख ते 13.08 लाख रुपये आहे.
Mahindra Bolero Neo
महिंद्राची ही कार या यादीतील सर्वात स्वस्त डिझेल वाहन आहे, ही कार फक्त सिंगल डिझेल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. 1.5 लीटर डिझेल इंजिन आणि 5 स्पीड गिअरबॉक्स असलेल्या या कारची किंमत 9 लाख 64 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 11 लाख 38 हजार रुपयांपर्यंत जाते.