WhatsApp : व्हॉट्सअॅपने केवळ चॅटिंग आणि मेसेजिंगच नव्हे, तर तुम्ही करु शकता ही 5 कामे


WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. भारतासारख्या देशात लोक याचा वापर मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी करतात. आपण व्हॉट्सअॅपला फक्त चॅटिंग किंवा मेसेज पाठवण्याचे व्यासपीठ म्हणून पाहतो. मात्र, हा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म चॅटिंग आणि मेसेजिंगशिवाय इतर अनेक गोष्टी करू शकतो. त्यामुळे मेटा सोशल मीडियाला फक्त चॅटिंगपुरते मर्यादित करू नका, कारण ते तुमची अनेक कामे क्षणार्धात करु शकतात.

अमेरिकन टेक कंपनीने व्हॉट्सअॅपमध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्स दिले आहेत, जेणेकरून लोकांचा अनुभव अधिक चांगला होऊ शकेल. कंपनीने या प्लॅटफॉर्मवर पेमेंट आणि ई-कॉमर्ससह अनेक सेवा जोडल्या आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत की तुम्‍ही मित्र आणि कुटुंबियांसोबत चॅट करण्‍याशिवाय व्‍हॉट्सअॅपवर आणखी काय काय करू शकता.

Metro Tickets : व्हॉट्सअॅपवर मिळतील मेट्रोची तिकिटे
मेट्रोची तिकिटे घेण्यासाठी तुम्हाला लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय व्हॉट्सअॅपद्वारे मेट्रो तिकीट खरेदी करू शकता. दिल्ली-एनसीआर मेट्रो आणि गुरुग्रामच्या रॅपिड मेट्रोची तिकिटे व्हॉट्सअॅपवरून खरेदी करता येतील. तुम्हाला फक्त ‘9650855800’ नंबर सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअॅपवर हाय लिहून मेसेज करायचा आहे. यानंतर, तुम्ही स्टेप्स पूर्ण करून तिकीट खरेदी करू शकता.

Cab Booking: व्हॉट्सअॅपद्वारे बुक केली जाईल कार
व्हॉट्सअॅप तुम्हाला कॅब बुक करण्याची सुविधाही देते. तुमच्या फोनमध्ये Uber अॅप नसेल, तर WhatsApp तुमच्यासाठी हे काम पूर्ण करेल. कॅब बुक करण्यासाठी, तुम्हाला पिकअपसाठी तुमचे रिअल-टाइम स्थान सेट करावे लागेल. Uber सेवेसाठी ‘7292000002’ नंबर सेव्ह करा. आता या नंबरवर हाय लिहून व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज पाठवा. यानंतर कॅब बुकिंगची प्रक्रिया सुरू होईल.

Buy Groceries: JioMart वरून करा खरेदी
तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून किराणा सामानही खरेदी करू शकता. JioMart च्या भागीदारीसह, हे प्लॅटफॉर्म तुम्हाला 50,000 उत्पादनांपैकी कोणतीही उत्पादने घरी बसून खरेदी करण्याची संधी देते. म्हणजे तुम्हाला स्थानिक दुकानात जाण्याची गरज नाही, तुम्ही घरबसल्या वस्तू ऑर्डर करू शकता. तुम्हाला ‘7977079770’ हा नंबर सेव्ह करावा लागेल आणि व्हॉट्सअॅपवर ‘हाय’ पाठवावा लागेल. यानंतर तुम्ही किराणा सामान खरेदी करू शकता.

DigiLocker: महत्त्वाची होतील कागदपत्रे उपलब्ध
तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (DL), वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) यांसारख्या कागदपत्रांची काळजी करण्याची गरज नाही. डिजीलॉकर सेवा व्हॉट्सअॅपसोबत जोडण्यात आली आहे. याद्वारे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे व्हॉट्सअॅपवरच मिळतील. या सेवेचा लाभ घेण्यासाठी डिजीलॉकर खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही ‘9013151515’ हा नंबर सेव्ह करून आणि हाय पाठवून डिजीलॉकरच्या सेवेचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp पेमेंट्स: WhatsApp द्वारे करा पैसे ट्रान्सफर
मित्र आणि कुटुंबातील व्यवहारांसाठी व्हॉट्सअॅप हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तुम्ही तुमचे बँक खाते WhatsApp पेमेंट्स वॉलेटशी लिंक केले असल्यास, तुम्ही सहज UPI पेमेंट करू शकता. ही सेवा विनामूल्य वापरली जाऊ शकते.