जगातील पहिले 3D मंदिर तेलंगणात, फोटोंमध्ये पहा त्याची वैशिष्ट्ये


भारतातील दक्षिणेकडील राज्य तेलंगणा येथे जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर पूर्ण झाले आहे.

हे थ्रीडी मंदिर बोरुपल्ली, सिद्धीपेट येथे आहे, ज्याला बांधण्यासाठी सुमारे साडेपाच महिने लागले. या मंदिराचे उद्घाटन आज 24 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

तेलंगणा राज्यातील सिद्धीपेट येथे जगातील पहिले 3D मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर अप्सुजा इन्फ्राटेकने अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स प्रदाता सिम्पलीफोर्ज क्रिएशन्सच्या सहकार्याने बांधले आहे.

तीन महिन्यांच्या मेहनतीने प्रिंट तयार करून उभारलेले हे सांस्कृतिक मंदिर आधुनिकतेचे दर्शन घडवते. या मंदिराची लांबी 35.5 फूट असून ती 4,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. तसेच या मंदिरात तीन गर्भगृहे बांधण्यात आली आहेत.

सिप्लिफोर्जचे चीफ ऑपरेशन ऑफिसर अमित घुले यांनी उद्घाटनापूर्वी सांगितले की, केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील हे पहिले 3D प्रिंटेड मंदिर आहे. तसेच कोणत्याही आपत्तीत त्याचे नुकसान होण्याची शक्यता कमी असेल, अशा पद्धतीने हे मंदिर बांधण्यात आले आहे.

या 3D मंदिराच्या आत, भगवान श्री गणेशाला समर्पित एक मोठा मोदक, भगवान शिवाला समर्पित शिवालय आणि देवी पार्वतीला समर्पित कमळाच्या आकाराचे विशाल घर बांधण्यात आले आहे.

या मंदिराची तीन शिखरे आणि गर्भगृहे थ्रीडी प्रिंटिंगद्वारे रोबोटिक बांधकामासह बांधण्यात आली आहेत. याशिवाय या मंदिराचे खांब, फरशी, स्लॅब इत्यादी बांधकामात पारंपारिक तंत्राचा वापर करण्यात आला आहे.