Elista Smart Tv : 32 इंच ते 65 इंचाचे 6 नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च, किंमत 16,999 रुपयांपासून सुरू


तुम्हालाही नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर एलिस्टाने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नव्हे तर 6 नवीन एलईडी टीव्ही मॉडेल लॉन्च केले आहेत. 32 इंच ते 65 इंचापर्यंतचे हे मॉडेल चांगल्या वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आले असून सर्वात स्वस्त टीव्ही मॉडेलची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

तुम्ही ही नवीनतम स्मार्ट टीव्ही मॉडेल्स भिंतीवर टांगू शकता किंवा स्टँडच्या मदतीने टेबलवर ठेवू शकता. कोणत्या मॉडेलसाठी किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घ्या.

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की सर्व मॉडेल्स Google TV OS वर चालतात, HDR 10 सपोर्टसह, उत्कृष्ट आवाजासाठी या मॉडेल्समध्ये डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट देखील असेल. Google TV चा यूजर इंटरफेस अगदी सोपा आहे, तुम्ही टीव्ही चालू करताच, Google TV तुमच्या आवडीच्या गोष्टी सुचवू लागतो.

गुगल टीव्हीसोबत येणाऱ्या या मॉडेल्समध्ये मुलांसाठी एक खास फीचरही देण्यात आले आहे, जे मुलांच्या वयानुसार टीव्हीवरील कंटेंट सुचवते.

कनेक्टिव्हिटीसाठी, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ आवृत्ती 5.1, इन-बिल्ट क्रोमकास्ट सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. गेमिंग कन्सोल, म्युझिक सिस्टीम आणि इतर गोष्टी टीव्हीशी जोडण्यासाठी 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट प्रदान केले आहेत.

कोणत्या मॉडेलची किंमत किती आहे?
Elista LED GTV 32HILD मॉडेलची किंमत 16999 रुपये आहे, 43 इंच Elista LED GTV 43FILED मॉडेलसाठी तुम्हाला 27 हजार 500 रुपये खर्च करावे लागतील.

43 इंच स्क्रीन आकारात आणखी एक प्रकार आहे, Elista LED GTV 43UILD मॉडेलची किंमत 31,500 रुपये आहे. तुम्हाला 50 इंच एलिस्टा LED-GTV 50UILED मॉडेल 39,990 रुपयांना मिळेल.

55 इंच एलिस्टा एलईडी GTV 55UILED मॉडेलची किंमत 42,990 रुपये आहे, तर 65 इंच मोठ्या स्क्रीन मॉडेलसाठी तुम्हाला 62 हजार 990 रुपये खर्च करावे लागतील.