Car Tips : गाडीत जमा होणारे बाष्प घेईल तुमचा जीव! ते टाळण्यासाठी रोज करा या गोष्टी


तुम्हीही गाडी चालवत असाल आणि त्यातच हिवाळ्यात गाडी चालवणे किती कठीण होऊन बसते, हे तुम्हाला माहीत असेलच. कारण कारच्या विंडशील्डवर धुके जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे दृश्यमानता कमी होते, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या, तर तुम्हाला गाडी चालवताना कधीही समस्या येणार नाही.

गाडीच्या काचेवर धुके साचू लागते, पण हे धुके क्षणार्धात दूर करण्याचा एक मार्ग आहे, जर तुमच्या गाडीच्या मागील आरशावर डीफॉगर असेल, तर तुम्ही गाडी चालवताना डीफॉगर फक्त तुमच्या मागच्या आरशावरील धुके काढून टाकू शकतो, पण समोरच्या आरशाचे काय?

समोरच्या आरशावर धुके साचल्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. जर तुम्हाला गाडी चालवताना त्रास होत असेल, तर समोरच्या आरशावरुन धुके कसे काढायचे, ते आम्ही तुम्हाला सांगतो. यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही, तुम्हाला फक्त कारमध्ये एसी चालू ठेवावा लागेल.

तुम्ही पण विचार कराल हि कसली युक्ती आहे, हिवाळ्यात हवामान थंड असते आणि वर एसी कोणी चालु ठेवतो का? पण ही युक्ती खूप उपयुक्त आहे, जेव्हा कारच्या काचेवर धुके जमा होऊ लागते, तेव्हा फक्त 1 क्रमांकावर एसी चालवा, परंतु एसी व्हेंट्स वरच्या दिशेने वळवा.

एसीमधून बाहेर पडणाऱ्या हवेमुळे काचेवरील धुके क्षणार्धात नाहीसे होईल आणि काच पूर्वीसारखी होईल ज्यामुळे तुम्हाला गाडी चालवताना कोणतीही अडचण येणार नाही. सोप्या भाषेत समजावून सांगितल्यास, एसी चालवल्याने काचेवर धुके पडत नाही आणि दृश्यमानता चांगली राहते.

जर तुमच्या कारच्या मागील बाजूस डिफॉगर दिलेला नसेल, तर तुम्हाला तुमच्या कारच्या मागील काचेतून धुके पूर्णपणे दूर होईपर्यंत एसी चालू ठेवावा लागेल. लक्षात घ्या की ही पद्धत पावसाळ्यात देखील तुमच्या कामी येईल, पावसाळ्यातही काचेवर धुके दिसू लागतात.