Free AI Courses : बना आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे मास्टर! Google-Amazon उपलब्ध करून देत आहे मोफत कोर्स


आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो. आज तुम्ही ChatGPT ला काहीही विचारू शकता, ते माणसांप्रमाणेच उत्तर देते. AI हे भविष्यात एक महत्त्वाचे क्षेत्र असणार आहे, तुम्ही स्वतःला या क्षेत्रात पुढे ठेवण्यासाठी AI शिकू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. अलीकडेच Amazon ने मोफत AI कोर्स ‘AI Ready’ लाँच केला आहे. याशिवाय गुगल देखील एआय कोर्सेसही मोफत देते.

एआय क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या टेक कंपन्यांचे वर्चस्व आहे. अॅमेझॉनलाही या क्षेत्राचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे कंपनीने मोफत एआय कोर्स सुरू केला आहे. Google आणि Amazon च्या मोफत AI कोर्सेसचा लाभ घेऊन तुम्ही AI चे चांगले ज्ञान मिळवू शकता. हा AI कोर्स केल्यानंतर तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळतील.

अॅमेझॉनचा एआय रेडी प्रोग्राम 2025 पर्यंत किमान 20 लाख लोकांना प्रशिक्षित करण्याचा आहे. यामध्ये मूलभूत ते प्रगत AI कौशल्ये शिकवली जातील. याद्वारे तुम्ही ChatGPT सारखे जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञान कसे वापरायचे ते शिकू शकाल. अॅमेझॉनच्या नवीन प्रोग्राममध्ये आठ एआय अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

येथे तुम्ही पाहू शकता Google चा मोफत AI कोर्स

  1. Introduction to Generative AI
  2. Introduction to Large Language Models
  3. Introduction to Responsible AI
  4. Introduction to Image Generation
  5. Encoder-Decoder Architecture
  6. Attention Mechanism
  7. Transformer Models and BERT Model
  8. Create Image Captioning Models

जेव्हा तुम्ही या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्याल, तेव्हा तुम्हाला व्हिडिओ आणि कागदपत्रे यांसारखे अभ्यास साहित्य विनामूल्य वापरता येईल. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार AI शिकू शकता, त्यामुळे डेडलाइन पूर्ण करण्याचा किंवा चाचण्यांना बसण्याचा कोणताही दबाव नाही. AI कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुमच्याकडे तुमच्या करिअरसाठी नवीन संधी आणि पर्याय असतील.