भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा विश्वविजेता बनण्यात अपयशी ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे संपूर्ण संघ निराश झाला होता, कारण टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ केला होता. या संघाने सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली, पण विजेतेपदाचा सामना जिंकता आला नाही. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आले होते. भारतीय संघाच्या पराभवानंतर पीएम मोदींनी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली आणि यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अश्रू अनावर झाले. शमीला रडताना पाहून पंतप्रधानांनी त्याला मिठी मारली.
वर्ल्डकप फायनल हरल्यानंतर पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर रडला मोहम्मद शमी, त्यांना मारली मिठी
शमीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे आणि मोदी त्याला मिठी मारत आहेत. त्याच्या इंस्टाग्रामवरील फोटोसह कॅप्शनमध्ये शमीने पंतप्रधानांना प्रोत्साहन देण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये आल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
विश्वचषकाच्या सुरुवातीला शमीला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर शमीला संधी मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि शानदार खेळ केला. शमीने या स्पर्धेत एकूण सात सामने खेळले आणि 24 बळी घेण्यात तो यशस्वी ठरला. यासह तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. या विश्वचषकात त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. शमी विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. तसेच तो एका विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरला.फायनलमध्येही शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले आणि डेव्हिड वॉर्नरला बाद केले. मात्र यानंतर त्याची जादू चालली नाही आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीय संघाचा फिरकीपटू रवींद्र जडेजानेही पीएम मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जडेजाने पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. जडेजाने लिहिले आहे की, टीम इंडियाची स्पर्धा खूप चांगली होती पण फायनलमध्ये टीम चांगली कामगिरी करू शकली नाही. जडेजाने लिहिले की, यामुळे संघ निराश झाला आणि अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी ड्रेसिंग रूममध्ये आले आणि संघातील खेळाडूंना भेटले, जे खूप प्रेरणादायी होते.